T20 World Cup 2024 : भारतीय संघाला संपवायचाय आयसीसी चषकाचा दुष्काळ

भारतीय संघातील मुख्य खेळाडू आयपीएल संपवून आता अमेरिकेला निघाले आहेत

188
T20 World Cup 2024 : भारतीय संघाला संपवायचाय आयसीसी चषकाचा दुष्काळ
T20 World Cup 2024 : भारतीय संघाला संपवायचाय आयसीसी चषकाचा दुष्काळ
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या पाठोपाठ आता टी-२० क्रिकेटमधील सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजेच विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. (T20 World Cup 2024) भारतीय संघाने सगळ्यात शेवटी २००७ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २०११ चा एकदिवसीय विश्वचषक सोडला तर भारतीय संघाने आयसीसीची महत्त्वाची स्पर्धाच जिंकलेली नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, आता ते अपयश पुसून टाकण्याची संधी भारतासमोर चालून आली आहे.

भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू आयपीएलच्या सेवेतून मुक्त झाले आहेत. आणि लवकरच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ते अमेरिकेला जायला निघतील.

आयपीएल लीग ही टी-२० प्रकारातील सगळ्यात मोठी लीग आहे. आणि तिचा अनुभव असतानाही टी-२० प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने एकमेव विजेतेपद पटकावलं आहे ते ही लीग सुरू होण्यापूर्वी. त्यानंतर २०१४ मध्ये भारताने अंतिम फेरीत धडक दिली होती. पण, लंकेकडून भारताचा पराभव झाला होता. टी-२० प्रकारात २००७ च्या विजेतेपदानंतर भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Sindhudurga Boat Accident : मच्छिमारांसाठी बर्फ घेऊन जाणारी बोट पलटली, दोन जणांचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता)

हे अपयश फक्त टी-२० पुरतं मर्यादितही नाही. आयसीसीकडून आयोजित होणारी शेवटची स्पर्धा भारताने जिंकली आहे ती २०१३ मध्ये. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने बाजी मारली होती. आणि तेव्हापासून भारताचा आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळ सुरू झाला आहे. गेल्यावर्षी भारतीय संघ विजेतेपदाच्या जवळ पोहोचूनही हरला.

आधी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडमध्ये खेळताना भारताला पराभव पत्करावा लागला. आणि त्यानंतर चारच महिन्यांनी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याच संघाने भारताला अंतिम फेरीत हरवलं. आता आणखी सात महिन्यांनी भारतीय संघ नवीन आव्हानासाठी तयार झाला आहे. (T20 World Cup 2024)

विराट कोहली हा भारताचा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2024) सगळ्यात यशस्वी फलंदाज आहे. २७ सामन्यांत त्याने ८१ च्या सरासरीने १,११४ धावा केल्या आहेत. आताही विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मावर (Rohit Sharma) संघाची मदार असणार आहे. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहबरोबरच कुलदीप, अक्षर, जाडेजा आणि चहल या फिरकीपटूंवर संघाचा भरवसा असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.