Maharashtra legislative Election : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची नवीन तारीख जाहीर?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जूनरोजी जाहीर करण्यात आली होती.

194
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली होती, मात्र त्याला विरोध झाल्याने ही निवडणूक स्थगित केली होती. शुक्रवार, २४ मे रोजी निवडणुकीची नवीन तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक (Maharashtra legislative Election) १० जूनरोजी जाहीर करण्यात आली होती.

निवडणूक आता 26 जून रोजी 

शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने या संदर्भात विचारविनिमय करून महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक (Maharashtra legislative Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे (Maharashtra legislative Election) प्रतिनिधित्व करणारे उबाठा गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत. नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. शेवटची मुदत ७ जून ठेवण्यात आली आहे. अर्जाची छाननी १० जून रोजी होईल. अर्ज माघारी घेण्यासाठी १२ जून आणि मतदान २६ जून रोजी घेतले जाणार आहे. तर मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी घेतली जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.