सध्या पुण्यातील रस्ते अपघाताची देशभर चर्चा होत आहे. भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने मोटारसायकलला धडक दिली, यात दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत १७ वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. या प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांच्या कारवाईची दिशा काय हे स्पष्ट करण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली. यामध्ये त्यांनी अल्पवयीनवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी कोर्टात केली असल्याचं सांगितलं आहे. तसेच, त्याच्या कृत्याचे काय परिणाम होऊ शकतात हे माहिती होतं, असे विधान अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी केले. (Pune Car Accident)
(हेही वाचा – Study Abroad: भारतीयांनी ब्रिटनचे स्वप्न सोडले! ब्रिटनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत घट)
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. पोर्शे कार अपघाताची घटना घडल्यावर प्राथमिक स्तरावर रविवारी (१९ मे) सकाळी ८ वाजता स्थानिक पोलिस ठाण्यात ३०४ (अ) चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी घटनाक्रम कळाल्यावर ३०४ कलम लावण्यात आला. जो अजामीनपात्र होता. त्याचदिवशी बाल हक्क मंडळात आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवावा ही मागणी करण्यात आली होती. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आरोपी बालकाला ‘बाल सुधार गृहात’ पाठवावे अशी मागणी केली होती. दोन्ही याचिका अमान्य झाल्या होत्या.
वडील आणि पबच्या मालकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आले. ३०४ च्या प्रकरणात आम्ही याचिका केल्याप्रमाणे बाल हक्क मंडळाने त्याला ५ जूनपर्यंत बाल सुधार गृहात पाठवले आहे. प्रौढ म्हणून खटला चालवण्याच्या निर्णायावर प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
चालकाचे म्हणणे तपासले जात आहे
घटनेदरम्यान चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचाही आम्ही तपास करत आहोत. सुरुवातीला ड्रायव्हरने गाडी चालवत असल्याचे सांगितले होते हे खरे आहे. चालकाने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य केले, याचाही आम्ही तपास करत आहोत. असे विधान पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांची पिझ्झा पार्टी झाल्याचे अद्याप दिसून आले नाही. पहिला आरोपीचा ब्लड नमुना हा सकाळी आठ वाजता गुन्हा दाखल झाल्यावर वाजता ११ करण्यात आले. तर दुसरा ब्लड रिपोर्ट हा सायंकाळी सात ते आठ वाजता घेण्यात आला. पुरव्यात ज्यांनी हस्तक्षेप केला त्यांच्यावर कलम 201 नुसार कारवाई करण्यात येईल, असे विधान आयुक्तांनी केले. येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांची पिझ्झा पार्टी झाल्याचे अद्याप दिसून आले नाही. पहिला आरोपीचा ब्लड नमुना हा सकाळी आठ वाजता गुन्हा दाखल झाल्यावर ११ वाजता करण्यात आली. तर दुसरा ब्लड रिपोर्ट हा सायंकाळी सात ते आठ वाजता घेण्यात आली. पुरव्यात ज्यांनी हस्तक्षेप केला त्यांच्यावर कलम २०१ नुसार कारवाई करण्यात येईल. (Pune Car Accident)
(हेही वाचा – Sindhudurga Boat Accident : मच्छिमारांसाठी बर्फ घेऊन जाणारी बोट पलटली, दोन जणांचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता)
नेकमे प्रकरण काय ?
पुणे शहरात १९ मे च्या मध्यरात्री एका १७ वर्षीय मुलाने सुमारे ३ कोटी रुपये किमतीची पोर्श कार भरधाव वेगात चालवत असताना दुचाकीला धडक दिली. वाहनाची धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा तोल सुटला आणि दुचाकी लांबपर्यंत रस्त्यावर फरफटत गेली, त्यामुळे दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर आरोपी अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. (Pune Car Accident)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community