Dombivli MIDC Blast : आग भडकण्यामागे काय होते नेमके कारण? वाचा…

212
Dombivli MIDC स्फोट प्रकरणाचा येत्या ३ आठवड्यांत तपास, उद्योगमंत्र्यांनी बैठकीत दिली 'ही' माहिती
Dombivli MIDC स्फोट प्रकरणाचा येत्या ३ आठवड्यांत तपास, उद्योगमंत्र्यांनी बैठकीत दिली 'ही' माहिती

डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC Blast) येथे अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या रिऍक्टर स्फोटानंतर लागलेली आग विझविण्यासाठी ‘फोम’ ऐवजी प्रथम पाण्याचा मारा केल्यामुळे आग भडकली असा दावा काही स्थानिकांनी केला आहे. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला तो पर्यत आगीने रौद्ररूप धारण केले होते, असा आरोप स्थानिकाकडून करण्यात येत आहे. परंतु आमच्याकडे फोमचा जेवढा साठा होता तेवढा आम्ही या ठिकाणी वापरला त्यामुळे आग पसरली नसल्याचे एमआयडीसी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (Dombivli MIDC Blast)

(हेही वाचा –मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत…)

डोंबिवली पूर्व एमआयडीसी फेस २ (Dombivli MIDC Blast) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या केमिकल कंपन्यामध्ये अती ज्वालाग्राही रासायनिक पदार्थ तयार केले जात आहे. या कपन्यांपैकी अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली.आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्याच बरोबर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोटानंतर लागलेली आग (Dombivli MIDC Blast) विझविण्यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाने प्रथम पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग अधिकच भडकत होती, त्यात केमिकल ड्रमचे छोटे मोठे स्फोट सुरू असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे येत होते. तासाभराने या आग विझविण्यासाठी फोम मागविण्यात आले व फोमच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू होता. (Dombivli MIDC Blast)

(हेही वाचा –Study Abroad: भारतीयांनी ब्रिटनचे स्वप्न सोडले! ब्रिटनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत घट)

अतीज्वालाग्राही रासायनिक द्रव्यला लागलेली आग पसरू नये किंवा तीला एका जागेवर थोपवून ठेवण्यासाठी प्रथम पाण्यापेक्षा फोमचा वापर केला असता तर आग भडकली नसती असा दावा जवळच्या केमिकल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होता. पाण्यामुळे केमिकलला लागलेली आग (Dombivli MIDC Blast) अधिक भडकते असा देखील दावा करण्यात येत होता. याबाबत येथील केमिकल कंपनी असोसिएशनचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांना विचारले असता एमआयडीसी अग्निशमन दलाकडे फोमचा पुरेसा साठा नव्हता, आम्ही फोम मागवुन अग्निशमन दलाला दिला, त्यामुळे ही आग आटोक्यात आली असे सोनी यांनी म्हटले. सोनी यांनी हे मान्य केले की, फोम चा प्रथम वापर झाला असता तर आगीवर फोमची चादर तयार होऊन आग भडकली नसती, केमिकलला लागलेली आगीला आटोक्यात ठेवण्यासाठी फोमचा वापर सर्वात प्रथम केला जातो असे सोनी यांनी म्हटले आहे. (Dombivli MIDC Blast)

(हेही वाचा –Pune Car Accident: पिझ्झा पार्टी, ब्लड रिपोर्टसंबंधी CP Amitesh Kumar यांची स्पष्टोक्ती)

परंतु आमच्याकडे फोमचा जेवढा साठा होता तेवढा आम्ही या ठिकाणी वापरला त्यामुळे आगीवर नियंत्रण ठेवता आले असे एमआयडीसी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (Dombivli MIDC Blast)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.