Lok Sabha Election मधील सहाव्या टप्प्यात कोणत्या 15 हाय-प्रोफाईल जागा आहेत?

तीन केंद्रीय मंत्री आणि तीन माजी मुख्यमंत्री रिंगणात आहेत, सर्वांच्या नजरा या दिग्गजांच्या जागांवर खिळल्या आहेत, ज्यात सिनेतारकांचाही समावेश आहे.

148
Lok Sabha Election मधील सहाव्या टप्प्यात कोणत्या 15 हाय-प्रोफाईल जागा आहेत?
Lok Sabha Election मधील सहाव्या टप्प्यात कोणत्या 15 हाय-प्रोफाईल जागा आहेत?
  • वंदना बर्वे

लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पाच टप्प्यांची निवडणूक झाली असून सहाव्या टप्प्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहाव्या टप्प्यात आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या एकूण 58 जागांवर मतदान होणार आहे. एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत. यातील अनेक दिग्गज चेहरे आहेत ज्यांच्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या टप्प्यावर तीन माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य ठरले आहे.

सहाव्या टप्प्यात तीन माजी मुख्यमंत्री आणि तीन केंद्रीय मंत्र्यांसह एकूण 889 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरणार आहेत. भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आझमगडमधून, अभिनेता राज बब्बर गुडगावमधून आणि मनोज तिवारी ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. 25 मे रोजी लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान होणार आहे.

(हेही वाचा – Dombivli MIDC Blast : आग भडकण्यामागे काय होते नेमके कारण? वाचा…)

1- कर्नाल लोकसभा जागा

माजी मुख्यमंत्री मनोहर लाल हरियाणातील कर्नाल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha Election) लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने दिव्यांशु बुधीराजा यांना उमेदवारी दिली आहे. जननायक जनता पक्षाकडून देवेंद्र कडियान आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा वीरेंद्र वर्मा (शरदचंद्र पवार) नशीब आजमावत आहेत. येथे नऊ अपक्षांसह एकूण १९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

2- अनंतनाग-राजौरी लोकसभा जागा

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात नॅशनल पँथर्स पार्टीने (भीम) अर्शीद अहमद लोन यांना तिकीट दिले आहे. मियां अल्ताफ अहमद नॅशनल कॉन्फरन्सकडून निवडणूक लढवत आहेत. येथे 10 अपक्षांसह एकूण 20 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

(हेही वाचा – Sindhudurga Boat Accident : मच्छिमारांसाठी बर्फ घेऊन जाणारी बोट पलटली, दोन जणांचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता)

2- डुमरियागंज लोकसभा जागा

माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल उत्तर प्रदेशातील डुमरियागंज लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. बसपने नदीम आणि सपाने भीष्म शंकर उर्फ कुशल तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. एका अपक्षासह एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

4- गुडगाव लोकसभा जागा

केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह हे चौथ्यांदा गुडगावमधून लोकसभेसाठी निवडणूक (Lok Sabha Election) लढवत आहेत. येथे काँग्रेसने चित्रपट अभिनेते राज बब्बर यांना तिकीट दिले आहे. राहुल फाजिलपुरिया जेजेपीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. इनेलोने सौरभ खान यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. नऊ अपक्षांसह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारतीय संघाला संपवायचाय आयसीसी चषकाचा दुष्काळ)

5- फरीदाबाद लोकसभा जागा

फरीदाबाद लोकसभा मतदारसंघातून सात अपक्षांसह एकूण २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. केंद्रीय मंत्री कृष्णपाल सिंह गुर्जर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने महेंद्र प्रताप सिंग यांना तर जेजेपीने नलिन हुडा यांना तिकीट दिले आहे. इनेलोने सुनील तेवतिया यांना उमेदवारी दिली आहे.

6- संबलपूर लोकसभा जागा

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने नागेंद्र कुमार प्रधान यांना तर बिजू जनता दलाने प्रणव प्रकाश दास यांना उमेदवारी दिली आहे. चार अपक्षांसह एकूण 14 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

7- पुरी लोकसभा जागा

भाजपा नेते संबित पात्रा पुरीमधून निवडणूक लढवत आहेत. बिजू जनता दलाने अरुप मोहन पटनायक यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसकडून जयनारायण पटनायक रिंगणात आहेत. संबित पात्रा यांचा गेल्या निवडणुकीत येथून पराभव झाला होता. यावेळी दोन अपक्षांसह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत.

(हेही वाचा – school syllabus: आता शालेय अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि बरंच काही…)

8- सुलतानपूर लोकसभा जागा

मनेका गांधी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधून निवडणूक लढवत आहेत. मनेका गांधी यांनी आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांच्या विरोधात बसपने उदराज वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. रामभुआल निषाद यांना समाजवादी पक्षाने तिकीट दिले आहे. अपक्षांसह एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

9- आझमगड लोकसभा जागा

भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ भाजपच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अखिलेश यादव यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र यादव सपाकडून निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीत निरहुआ यांनी धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला होता. बसपाने मशहूद सबिहा अन्सारी यांना तिकीट दिले आहे. तीन अपक्षांसह एकूण नऊ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

10- कुरुक्षेत्र लोकसभा जागा

हरियाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून उद्योगपती नवीन जिंदाल भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर येथून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेस-आप युतीचे डॉ. सुशील गुप्ता आणि आयएनएलडीचे आमदार अभयसिंह चौटाला आहेत. जेजेपीने पाला राम सैनी यांना तिकीट दिले आहे. येथे 16 अपक्षांसह एकूण 31 उमेदवार निवडणूक लढले आहेत.

(हेही वाचा – World Indoor Cricket Cup : जागतिक इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल)

11- रोहतक लोकसभा जागा

माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुडा हरियाणाच्या रोहतक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. त्यांची लढत विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार अरविंद शर्मा यांच्याशी आहे. जेजेपीने रवींद यांना तिकीट दिले आहे. 15 अपक्षांसह एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत.

12- ईशान्य दिल्ली लोकसभा जागा

येथे भाजपचे विद्यमान खासदार आणि भोजपुरी गायक मनोज तिवारी काँग्रेस-आप उमेदवार कन्हैया कुमार यांच्या विरोधात लढत आहेत. बसपाने अशोक कुमार यांना उमेदवारी दिली आहे. नऊ अपक्षांसह एकूण 29 उमेदवार रिंगणात आहेत.

13- नवी दिल्ली लोकसभा जागा

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांनी पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. सोमनाथ भारती ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. बसपाने राजकुमार आनंद यांना तिकीट दिले आहे. चार अपक्षांसह 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

(हेही वाचा – Rafael Nadal : नदालच्या तंदुरुस्तीची चर्चा रंगलेली असताना नदालचा फ्रेंच ओपनसाठी सराव)

14- पूर्व चंपारण लोकसभा जागा

माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह बिहारमधील पूर्व चंपारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विकासशील इंसान पार्टीने डॉ. राजेश कुमार यांना सहा वेळा खासदार राधामोहन सिंह यांच्या विरोधात उभे केले आहे. विकासशील इंसान पक्षाला ही जागा राजदसोबत युती करून मिळाली आहे. सहा अपक्षांसह एकूण 12 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

15- सिवान लोकसभा जागा

बिहारमधील सिवान लोकसभा जागा हायप्रोफाईल बनली आहे. याचे कारण म्हणजे बाहुबली शहाबुद्दीनची पत्नी हिना शहाब हिने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) माजी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. जनता दल (युनायटेड)कडून विजयालक्ष्मी देवी रिंगणात आहेत. दिलीप सिंह बसपकडून निवडणूक लढवत आहेत. नऊ अपक्षांसह एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.