Dombivli MIDC Blast प्रकरणी मालती मेहताला नाशिकमधून अटक 

अमुदान केमिकल कंपनीचे मालक मालती मेहता आणि मुलगी मलेय मेहतासह संचालक, व्यवस्थापक, अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

215
डोंबिवली MIDCमध्ये पुन्हा स्फोट, परिसरात धुराचे लोट; नेमकं काय घडलं?
डोंबिवली MIDCमध्ये पुन्हा स्फोट, परिसरात धुराचे लोट; नेमकं काय घडलं?

डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC Blast) अमुदान केमिकल कंपनीत (Amudan Chemical Company) गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर इतर छोटे स्फोट झाले. या घटनेत कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आले आहे. (Dombivli MIDC Blast)

(हेही वाचा – Dombivli MIDC Blast : आग भडकण्यामागे काय होते नेमके कारण? वाचा…)  

मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) गुरुवारी रात्री डोंबिवली स्फोट प्रकरणात अमुदान केमिकल कंपनीचे मालक मालती मेहता (Owner Malti Mehta) आणि मुलगी मलेय मेहतासह संचालक, व्यवस्थापक, अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती महेता आणि मलेय मेहता हे मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास असून या स्फोटाच्या घटनेनंतर मेहता कुटुंब फरार झाले होते. शुक्रवारी दुपारी ठाणे गुन्हे शाखेने  शोध घेत नाशिक येथून मालती मेहताला अटक केली आहे. पुढील तपासासाठी मालती मेहताचा ताबा मानपाडा पोलिसांकडे देण्यात आला आहे. तसेच शनिवारी मालती मेहताला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

(हेही वाचा – World Indoor Cricket Cup : जागतिक इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल)

डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC) मधील अमुदान केमिकल कंपनीमधील बॉयलरचा स्फोट झाला. गुरुवारी दुपारी डोंबिवली पूर्व एमआयडीसी फेस २ येथे असलेल्या आमुदान या केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण जखमी झाले आहेत. तर मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Dombivli MIDC Blast)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.