Pune Car Accident: विशाल अग्रवालसह इतरांची १४ दिवसांची न्यायालयीन  कोठडीत रवानगी 

162
Pune Car Accident: विशाल अग्रवालसह इतरांची १४ दिवसांची न्यायालयीन  कोठडीत रवानगी 

सध्या पुण्यातील रस्ते  (Pune Car Accident) अपघाताची देशभर चर्चा होत आहे. भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने मोटारसायकलला धडक दिली, यात दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत १७ वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. या प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी विशाल अग्रवाल (vishal agrawal) याच्या मुलाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले होते. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर विशालला सत्र न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान ती शुक्रवारी संपल्याने पुन्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी सत्र न्यायालयाने विशाल अग्रवालयांच्या सह अन्य आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (14 days judicial custody) सुनावली आहे. (Pune Car Accident)

सरकारी वकिलांचा युक्तीवाद –

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील विद्या विभुते (Gov Adv Vidya Vibhute) यांनी युक्तीवाद केला की, वाहनाची नोंदणी केली नाही. ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरा समोरील रजिस्टर ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलाने ४७ हजाराचे दारुचे बिल भरले. त्याच्या बँक खात्याची तपासणी गरजेचे आहे. गाडी बर्म्हा लिमिटेड कंपनीच्या नावावर आहे. सीसीटीव्हीत फेरफार केल्याचे आढळले आहे. पोर्शे गाडीचा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. जे अन्य आरोपी आहेत. त्यात हॉटेलमधील कुणी मुलाला आत घेतले, कुणी दारू दिली त्याचा तपास व्हायचा आहे. आरोपी हा ब्लॅक पबमध्ये (Black Pub) होता त्या वेळी आणखी कोण कोण होते, याचा तपास होणे गरजेचे आहे. या सोबतच आरोपी मुलांसोबत जी मुले होती त्यांनी दारूसोबत आणखी काही अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याचा देखील तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळणे गरजेची आहे.  (Pune Car Accident)

(हेही पाहा – Sharad Pawar : राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष)

विशाल अग्रवालच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला?

ही अपघाताची केस आहे. मात्र यामध्ये मीडिया ट्रायल सुरु आहे. १ हजार ७५८ रुपये फी भरली नाही म्हणून शासनाची फसवणूक केल्याचं म्हणत अगरवालांवर कलम ४२० लावलं. आरोपीने पॉकेटमनीतून पबमध्ये पैसे भरले की बँक खात्यातून याचा तपास करावा. पैसे कुठून भरले याचा तपास करायला पोलिसांना वेळ का लागतो?”, असा युक्तिवाद विशाल अग्रवालच्या वकिलांनी केला. पोलिसांना जो काही तपास करायचा होता त्यासाठी एवढा वेळ का लागतोय? विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने पैसे नेमके कुठून भरले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता काय? असा युक्तिवाद विशाल अग्रवालच्या वकिलांनी केला. (Pune Car Accident)

 हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.