मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी-अधिक होत असतानाच, शुक्रवारी हा आकडा पुन्हा कमी झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात ९२९ रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा १ मार्चच्या रुग्ण संख्येएवढी रुग्ण संख्या आढळून आली असून, मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे.
अशी आहे शुक्रवारची आकडेवारी
गुरुवारी मुंबईत जिथे १२६६ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी ९२९ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १ हजार २३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शुक्रवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २७ हजार ९५८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. गुरुवारी जिथे दिवसभरात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शुक्रवारी ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १४ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १८ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असून, चाळीशीच्या आतील ६ रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील १६ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ८ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
२८ मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ९२९
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १२३९
बरे झालेले एकूण रुग्ण – ६५८५४०
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९४%एकूण सक्रिय रुग्ण- २७९५८
दुप्पटीचा दर- ३७० दिवस
कोविड वाढीचा दर ( २१ मे ते २७ मे)- ०.१८ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 28, 2021
(हेही वाचाः आता गावागावात कोविड सेंटर, असे सुरू आहे गावपातळीवर काम)
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ३७० दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १७५ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ४१ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community