डोंबिवली पूर्व एमआयडीसी येथे झालेल्या केमिकल रिऍक्टर स्फोटाचा (Dombivli Chemical blast) तपास ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणी अमुदान केमिकल कंपनीचा मुख्य मालक मलय मेहता आणि आई मालती मेहता यांना ठाणे आणि नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. मलये मेहताला रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. मालती मेहता यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
डोंबवली पूर्व एमआयडीसी फेस २ या ठिकाणी गुरुवारी दुपारी झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या केमिकल रिऍक्टरचा स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण जखमी झाले आहे. या स्फोटप्रकरणी अमुदान केमिकल फॅक्टरीचे मालक मालती मेहता आणि मुलगी मलय मेहता यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा, स्फोटक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
(हेही वाचा Manusmriti वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती; रमेश शिंदेंचा हल्लाबोल)
.. तर मालती मेहता यांना अटक होईल
मालती महेता आणि मलय मेहता हे मुंबईतील घाटकोपर येथे राहत असून या स्फोटाच्या घटनेनंतर मेहता कुटुंब फरार झाले होते. ठाणे गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेत नाशिक येथून मालती मेहताला अटक केली आहे. पुढील तपासासाठी मालती मेहताचा ताबा मानपाडा पोलिसांकडे देण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याकडून ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी अमुदान केमिकल कंपनीचे मुख्य मालक मलय मेहता याला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले असून मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक आणि विशेष टास्क फोर्सचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली. मुख्य आरोपी मलय मेहता याला अटक करण्यात आली असून मालती मेहता यांची अद्याप या गुन्ह्यात भूमिका आढळून न आल्यामुळे त्यांना सोडण्यात आले आहे, तपासात त्यांची भूमिका निष्पन्न झाल्यास त्यांना देखील अटक करण्यात येईल, अशी माहिती बागडे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community