Dharavi Redevelopment Project: धारावीकरांची मते महायुतीकडे का गेली?

288
Dharavi Redevelopment Project: धारावीकरांची मते महायुतीकडे का गेली?
Dharavi Redevelopment Project: धारावीकरांची मते महायुतीकडे का गेली?

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील धारावी विधानसभा क्षेत्रात मिळालेले मतदान महायुतीच्या पारड्यात गेल्याची चर्चा आता धारावीमध्ये होत आहे. या मतदार संघात 48.52 टक्के मतदान झाले त्यातील मोठा वाटा महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना गेल्याचे दिसून येत आहे.

अनिल देसाई यांना फटका

जवळपास 600 एकर जागेवर पसरलेल्या आणि सुमारे 23,000 कोटी रुपये किमतीचा धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) लोकसभा निवडणुकीत फार महत्वाची भूमिका बजावू शकतो. अनेकांच्या घराचे स्वप्न या प्रकल्पातून पूर्ण होणार आहे. आणि या प्रकल्पाला शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. त्याचा फटका उबाठाचे उमेदवार अनिल देसाई यांना बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(हेही वाचा – Sharad Pawar : राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष)

पात्र-अपात्र सर्वांना घरे

धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) प्रा. लिमिटेड (DRPPL), महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम असून धारावीला शहरी कायाकल्पाचे मॉडेल बनवण्याचा प्रयत्न आसल्याचे अदानी समूहाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. पात्र असो वा अपात्र, सर्व धारावीकरांना नवीन घरे मिळतील. त्यांना की-टू-की सोल्यूशन प्रदान केले जाईल आणि संक्रमण शिबिरांमध्ये ठेवण्याऐवजी ते थेट नवीन घरांमध्ये जातील. सर्व पात्र सदनिकाधारकांना धारावीमध्येच किमान 350 चौरस फूट क्षेत्रफळाची घरे दिली जातील, ज्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांतर्गत घरांसाठी नवीन मानक स्थापित केले जाईल. निविदेत पात्र नसलेल्या सदनिकांसाठीही तरतूद आहे; त्यांना महाराष्ट्र शासनाच्या भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेनुसार घरे उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी सांगितले आहे.

अदानी समूहाचे स्पष्टीकरण

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अदानी समूहावर अनेक आरोप केले त्याचे त्यांनी खंडन करताना अदानी समूहाची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित होती, अदानी समूहाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहभागींसाठी खुल्या असलेल्या निविदामध्ये सर्वोच्च बोली सादर केली होती. निविदेच्या अटी व शर्ती पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम करण्यात आल्या होत्या, असे स्पष्ट करण्यात आले.

(हेही वाचा – Pune Car Accident: विशाल अग्रवालसह इतरांची १४ दिवसांची न्यायालयीन  कोठडीत रवानगी )

आकर्षक ऑफरमुळे ठाकरे यांच्या विरोधात मतदान

यामुळे धारावीत अनेक स्थानिक लोक या प्रकल्पाच्या बाजूने असून उघडपणे नाही तरी राज्यातील शिंदे सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत, अशी चर्चा स्थानिक पातळीवर होताना दिसते. धारावीचा पुनर्विकास अदानीच्या आकर्षक ऑफरमुळे ठाकरे यांच्या विरोधात आणि शिंदे यांच्या पथ्यावर पडला असल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार असल्या तरी यावेळी त्या उत्तर-मध्य मतदार संघात स्वतःच्या प्रचारात व्यस्त असल्याने विधानसभा क्षेत्रात फार फिरकल्याही नाहीत. त्यामुळे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा या मतदार संघात केवळ 48.52 टक्के मतदान झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.