विशेष प्रतिनिधी, मुंबई
घाटकोपर येथे जाहिरात फलक (होर्डिंग) (Ghatkopar Hoarding Accident) कोसळून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) जाहिरात फलकांसाठी ठरवून दिलेल्या नियमांना सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे. अधिकृत जाहिरात फलकांचीदेखील तत्काळ संरचनात्मक स्थिरता तपासावी तसेच अनधिकृत जाहिरात फलक तत्काळ पाडून टाकावे.आणि त्याविरोधात कारवाई करावी. कारण माणसे मारण्याचा परवाना कुणालाच दिला नाही.अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापालिकेला निर्देश दिले.
(हेही वाचा- दरड, इमारत दुर्घटनेतील बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन शाळा किंवा शेडमध्ये नको; CM Eknath Shinde यांनी काय दिले निर्देश?)
मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात महानगरपालिका (BMC) मुख्यालयात विविध प्राधिकरण यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची बैठक पार पडली. यानंतर प्रसार माध्यमांशी घेवून बोलतांना शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हे निर्देश दिले.घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलक दुर्घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील सात फलक तोडण्यात आले. जाहिरात फलक बाबत महापालिकेची मार्गदर्शक तत्वे असून त्यानुसारच प्रत्येक प्राधिकरण यांनी जाहिरात फलक लावले पाहिजे. कुठलेही धोकादायक असेल तर काढून टाका अनाधिकृत असेल तर थेट काढून टाका,असे निर्देश त्यांनी दिले. तसेच जर अधिकृत असेल तर फलकाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी केली. (CM Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community