Jyoti Yarraji : ॲथलीट ज्योती याराजीची ऑलिम्पिक पात्रता ०.०१ सेकंदांनी हुकली

Jyoti Yarraji : १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योतीने राष्ट्रीय विक्रम तर केला, पण पॅरिसचं तिकीट मिळवू शकली नाही 

118
Jyoti Yarraji : ॲथलीट ज्योती याराजीची ऑलिम्पिक पात्रता ०.०१ सेकंदांनी हुकली
Jyoti Yarraji : ॲथलीट ज्योती याराजीची ऑलिम्पिक पात्रता ०.०१ सेकंदांनी हुकली
  • ऋजुता लुकतुके

आशियाई खेळातील रौप्य पदक विजेती ॲथलीट ज्योती याराजीने (Jyoti Yarraji) मोटोनेट जीपी ॲथलेटिक्स मीटमध्ये राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली. पण, पॅरिस ऑलिम्पिकचं (Paris Olympics) तिचं तिकीट ०.०१ सेकंदांनी थोडक्यात हुकलं. ज्योती ही १०० मीटर अडथळ्यांची शर्यत धावते. या प्रकारात ती भारताची अव्वल ॲथलीट आहे. या हंगामात तिची ही तिसरी स्पर्धा होती. ऑलिम्पिक पात्रतेचा निकष आहे १२.७७ सेकंदांचा. ज्योतीने वेळ दिली ती १२.७८ सेकंदांची. (Jyoti Yarraji)

विशेष म्हणजे गेल्यावर्षी विद्यापीठ खेळांत ज्योतीने इतकीच वेळ दिली होती. तेव्हाही तिची ऑलिम्पिक पात्रता ०.०१ सेकंदांनी हुकली होती. चीनच्या चेंगडूमध्ये झालेल्या त्या स्पर्धेनंतर ज्योती आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र उदयाला आली. (Jyoti Yarraji)

(हेही वाचा- CM Eknath Shinde : अनधिकृत जाहिरात फलक दिसताच तोडा, मुख्यमंत्री शिंदे असे का म्हणाले…)

पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिर्सेनं (Tejas Shirsen) नवीन राष्ट्रीय विक्रमासह १३.४१ सेकंदांची वेळ दिली. पण, तिथेही ऑलिम्पिक पात्रता निकष १३.२७ सेकंदांचा असल्याने तेजसचीही पात्रता संधी हुकली आहे. मात्र तेजसने थिंगालियाचा २०१७ पासूनचा राष्ट्रीय विक्रम मोडला. थिंगालियाने १३.४८ सेकंदांत ११० मीटर अडथळ्यांची शर्यत पूर्ण केली होती. पुरुषांची ८०० मीटरची शर्यत महम्मद फसलने जिंकली. (Jyoti Yarraji)

त्याने १.४८.९१ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली. तर पुरुषांच्या १०० मीटर शर्यंतीत २० वर्षीय अनिमेष कुजुर (Animesh Kujur) १०.३९ सेकंदांसह पहिला आला. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर २०० मीटर प्रकारातील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेला अमलन बोरगोहेन १०.५४ सेकंदांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. (Jyoti Yarraji)

(हेही वाचा- Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा!)

ऑलिम्पिक पात्रतेसाठीची मुदत ३० जूनला संपणार आहे. त्याआधी ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय ॲथलीट आता जीवाचं रान करत आहेत. (Jyoti Yarraji)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.