Pune Accident नंतर आता मद्यविक्री दुकानांवर सरकारी कॅमेरांची असणार करडी नजर

216
पुणे येथील अग्रवालाच्या ‘बाळा’ ने मद्यप्राशन करून केलेल्या अपघातात (Pune Accident) दोघांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मद्यविक्री करणाऱ्या केंद्राचे वेबकास्टिंग अर्थात सरकारी कॅमेरांची त्यावर करडी नजर ठेवण्याचा प्रस्ताव येणार आहे.

मद्यविक्री करणाऱ्यांकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन

अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, वेळेची मर्यादा न पाळणे यांसह नियमांचे उल्लंघन होत आहे की नाही, याची पाहणी करणे सोयीचे व्हावे, यासाठी मतदान केंद्रांप्रमाणेच मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलांचे वेबकास्टिंग करता येणे शक्य होईल. यावर विचार करावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिला. पुण्यातील कल्याणी नगरमधील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात (Pune Accident) अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, वेळेचे नियम न पाळणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनतर जागे झालेल्या उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या मोहिमेत ३२ ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना टाळे लावण्याची कारवाई जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केली. त्यावरून मद्यविक्री करणाऱ्यांकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलचे वेबकास्टिंग करून त्यांच्यावर नियंत्रण आणण्याबाबत चाचपणी करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.