मिठी नदी (Mithi River) रूंदीकरण प्रकल्प कामात अडथळा ठरणाऱ्या एकूण १४९ बांधकामे हटवण्याची कार्यवाही शुक्रवारी २४ मे २०२४ रोजी आणि शनिवारी २५ मे २०२४ रोजी अशा सलग दोन दिवसात करण्यात आली. उच्च न्यायालयाने बांधकामे तोडण्याची परवानगी दिल्यानंतर कुर्ला एल विभागाच्या वतीने सांताक्रूझ-चेंबूर रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. यामुळे सुमारे ८ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त झाले तर प्रकल्प अंतर्गत रूंदीकरणासाठी ३०० मीटर रूंदीचे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. (Mithi River)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अमित सैनी यांनी प्रकल्पस्थळी पाहणी करून वेळोवेळी ही अतिक्रमणे हटवण्याच्या कार्यवाहीचा पाठपुरावा केला होता. तसेच रुंदीकरण प्रकल्पाला अडथळा ठरणारी बांधकामे हटवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी सातत्याने निर्देश दिले होते. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी उपआयुक्त (परिमंडळ ५) देविदास क्षीरसागर, एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर आणि विधी विभाग यांच्या संयुक्त कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच पर्जन्य जलवाहिन्या आणि रस्ते विभागाने तातडीने प्रकल्पातील पुढील कार्यवाही सुरू करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. (Mithi River)
(हेही वाचा – Pune Accident नंतर आता मद्यविक्री दुकानांवर सरकारी कॅमेरांची असणार करडी नजर)
उच्च न्यायालयाने दिले हे निर्देश
प्रकल्पाच्या ठिकाणी सातत्याने होणारा स्थानिकांचा विरोध आणि प्रदीर्घ कायदेशीर लढा यानंतर विविध विभागांमध्ये चांगला समन्वय साधून ही निष्कासन कार्यवाही पार पडली. एल विभागासोबत विविध विभागांचा संयुक्त सहभाग अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या कार्यवाहीत मोलाचा होता, अशी माहिती उपआयुक्त (परिमंडळ ५) देविदास क्षीरसागर यांनी दिली. अतिक्रमणे हटविण्यात आल्यानंतर, मिठी नदी रूंदीकरण प्रकल्प अंतर्गत या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना पर्जन्य जलवाहिन्या विभागाला देण्यात आल्या आहेत. (Mithi River)
या निष्कासन कार्यवाही दरम्यान पर्जन्य जलवाहिन्या विभागाने तातडीने संयंत्रांचा पुरवठाही केला होता. त्यानुसार प्रकल्पस्थळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने तातडीने संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच रुंदीकरण प्रकल्पात अडथळा ठरणारी उर्वरीत बांधकामे ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आगामी काळात निष्कासित करण्यात येतील, असे सहायक आयुक्त हेर्लेकर यांनी सांगितले. रस्ते विभागालाही लाल बहादूर शास्त्री मार्ग ते मिठी नदी (Mithi River) भागातील बॉक्स ड्रेनची कामे तातडीने करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ज्या अधिकृत बांधकांविरोधात तोडक कार्यवाही करण्यात आली आहे, त्याठिकाणी काही प्रमाणात अंतरिम भरपाई किंवा पर्यायी व्यवस्था आगामी चार आठवड्यात करण्यात येणार आहे. या कारवाईने बाधित मालकी असणार्या व्यक्तींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. (Mithi River)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community