Chandrapur : ताडोबात चंद्रप्रकाशात ५५ वाघ, १७ बिबट्यांसह विविध वन्यप्राण्यांचे दर्शन

बफर क्षेत्रातील एकूण ६ वनपरिक्षेत्रांतील ७९ मचाणी उभारल्या होत्या आणि या मचाणींवर एकूण १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांसोबत बसून प्राणी गणना केली.

195
Chandrapur : ताडोबात चंद्रप्रकाशात ५५ वाघ, १७ बिबट्यांसह विविध वन्यप्राण्यांचे दर्शन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने निसर्गानुभव उपक्रम पार पडला. दरम्यान, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर व बफर क्षेत्र मिळून ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ गवे अशा एकूण ५,०६९ मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली असल्याची माहिती शनिवारी समोर आली. (Chandrapur)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बुद्धपौर्णिमेला निसर्गानुभव उपक्रम पार पडला. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भारतातील विविध राज्यांतील निसर्गप्रेमींनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. बफर क्षेत्रातील एकूण ६ वनपरिक्षेत्रांतील ७९ मचाणी उभारल्या होत्या आणि या मचाणींवर एकूण १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांसोबत बसून प्राणी गणना केली. याशिवाय कोर विभागातील ५ वनपरिक्षेत्रांतील एकूण ७६ मचाणींवर बसून वन अधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी प्राणी गणना केली. (Chandrapur)

(हेही वाचा – Nashik: नाशिकमध्ये २२ तास वीजपुरवठा खंडित, अभियंत्यांच्या ‘या’ उत्तरामुळे संतप्त नागरिकांनी सबस्टेशनला ठोकले टाळे)

इतक्या प्राण्यांची नोंद 

या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान बफर क्षेत्रात २६ वाघांची व ८ बिबट्यांची नोंद झाली तर कोर क्षेत्रात २९ वाघांची व ९ बिबट्यांची नोंद करण्यात आली. याशिवाय बफर क्षेत्रात १७ रानकुत्रे, ३२ अस्वल, ४०३ चितळ, १६६ सांबर, ३४४ गवे असे सर्व मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी मिळून एकूण १,९७७ प्राण्यांची नोंद झाली आहे. कोर क्षेत्रात २९ वाघ, ९ बिबट, ६९ रानकुत्रे, ३३ अस्वल, २१५ गवा, १०५५ चितळ, ३२२ सांबर असे सर्व मिळून ३,०९२ प्राण्यांची नोंद झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Chandrapur)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर व बफर क्षेत्र मिळून ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ गवे अशा एकूण ५,०६९ मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली आहे. बफर क्षेत्रात निसर्गप्रेमींच्या सहभागातून, तर वन कर्मचाऱ्यांच्या सहभागातून कोर क्षेत्रात निसर्गानुभव कार्यक्रम पार पडला. (Chandrapur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.