महागाईने होरपळणाऱ्या Pakistan ला भिक देखील मिळेना

248
महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानच्या (pakistan) अडचणी आणखी वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), ज्यांच्यासमोर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पैशांसाठी हात पसरला होता, त्यांना एक रुपयाही देण्यास नकार दिला आहे. आयएमएफने बेलआउट पॅकेजसाठी पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. आर्थिक सुधारणांचे परीक्षण केल्यानंतर, IMF संघ वॉशिंग्टनला परतला. परतण्यापूर्वी संघाने पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत डोनाल्ड ब्लॉम यांची भेट घेतली.

पीठ, तांदूळ ते स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती आवाक्याबाहेर 

IMF टीम 10 मे रोजी पाकिस्तानात पोहोचली. नवीन बेलआउट पॅकेजच्या संदर्भात दोन्ही बाजूंमध्ये कर्मचारी स्तरावरील करारावर स्वाक्षरी होणार होती, परंतु खराब आर्थिक परिस्थिती आणि अटींची पूर्तता न झाल्यामुळे हे होऊ शकले नाही. IMF संघाने सांगितले की, नवीन बेलआउट पॅकेजवर चर्चा केली जाईल आणि आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी घातलेल्या अटींच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतरच विचार केला जाईल. आयएमएफने सांगितले की, अटी पूर्ण करण्यासाठी उचललेल्या पावलांचा आढावा घेतल्यानंतरच करारावर स्वाक्षरी केली जाईल. महागाई वाढत असताना आयएमएफने पाकिस्तानला (pakistan) धक्का दिला आहे. पीठ, तांदूळ ते स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तसेच देशाच्या इतर भागातही लोक महागाई आणि सरकारच्या अकार्यक्षमतेविरोधात हिंसक आंदोलन करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.