Fire News: दिल्लीतही अग्नितांडव! बेबी केअर सेंटरला आग, ७ नवजात बालकांचा मृत्यू

157
Fire News: दिल्लीतही अग्नितांडव! बेबी केअर सेंटरला आग, ७ नवजात बालकांचा मृत्यू
Fire News: दिल्लीतही अग्नितांडव! बेबी केअर सेंटरला आग, ७ नवजात बालकांचा मृत्यू

दिल्लीच्या विवेक विहार इथल्या एका बेबी केअर सेंटरला (Baby care center) शनिवारी (२५ मे) रात्री उशिरा भीषण आग (Fire News) लागली. या आगीत 7 लहान बाळांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला रात्री साडेबाराच्या दरम्यान मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थाळावर गेल्या. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केले. त्यात 12 लहान बाळांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील 7 बाळांचा मृत्यू झाला आहे. जखमी 5 बाळांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईस्ट दिल्ली एडवांस्ड केअर हॉस्पिटल मध्ये या मुलांना दाखल करण्यात आले आहे. (Fire News)

३ मजली इमारत जळून खाक

दिल्लीत रात्री साडे अकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन आला. विवेक विहार परिसरात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर घटनास्थळी ९ गाड्या पाठवण्यात आल्या. त्यावेळी इमारतीतूनव १२ नवजात बाळांना बाहेर काढण्यात आलं. आग इतकी भीषण होती की या आगीत ३ मजली इमारत जळून खाक झाली. (Fire News)

(हेही वाचा –IT Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाची धाड! बंगल्यातील फर्निचर फोडून काढल्या नोटा)

अग्निशमन दल विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितलं की, विवेक विहारमध्ये आयआयटी ब्लॉक बीजवळ एक बेबी केअर सेंटर आहे. त्याठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तिथून बाहेर काढलेल्या बाळांना दुसऱ्या एका रुग्णालयात दाखल केलं. (Fire News)

गुजरातच्या गेम झोनमध्ये भीषण आग

दरम्यान, एकीकडे दिल्लीत आग लागली असताना दुसरीकडे गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 12 लहान मुलांचा समावेश आहे. कित्येक जण बेपत्ता असल्याचेही म्हटले जात आहे. पण शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. शनिवारी (25 मे 2024) संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Fire News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.