अंधेरिस्थित एका प्रसिद्ध खासगी कोचिंग क्लासेसमध्ये (Coaching Classes) एका विद्यार्थिनीने २०१४ जेईई आणि जेईई अॅडव्हान्ससाठी प्रवेश घेतला. त्यासाठी तिने आगाऊ रक्कम म्हणून ५० हजार भरले. मात्र, दोन-तीन लेक्चर अटेंड केल्यानंतर तिला शिकवलेले समजत नव्हते. त्यामुळे तिने आपण कॉमर्स घेत आहोत, असे सांगून क्लासमधील सरांना फी परत करण्याचे विनंती केली. सरांनी तिला लेखी लिहून देण्यास सांगितले. त्यानंतर अनेकवेळा पाठपुरावा करुनही क्लासने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्या मुलीच्या पालकांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार केली. मुलीला तिथे शिकवलेले समजत नव्हते, असे त्या तक्रारीत म्हटले होते. (Coaching Classes)
(हेही वाचा – Gaming Zone Fire : राजकोट अग्निकांड प्रकरणात न्यायालयाची दखल, सुनावणी होणार!)
आयआयटी, जेईईसाठी प्रसिद्ध असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये (Coaching Classes) शिकवलेले समजत नाही म्हणून एका विद्यार्थिनीने फी परत मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र फी परत न करण्याचा नियम आहे आणि त्यावर पालकांची सही आहे, असे म्हणत फी परत न करणाऱ्या क्लासला मुंबई उपनगर ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला. विद्यार्थिनीने फी म्हणून भरलेले ५० हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश आयोगाने क्लासला दिले आहे. तिला व तिच्या पालकांना झालेल्या मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेशही दिले. (Coaching Classes)
प्रवेशाचे पुरावे दाखवले नाहीत
मुलीला स्कॉलरशिपद्वारे प्रवेश देण्यात आला, ही माहिती क्लासने लपवली, असा युक्तिवाद पालकांनी केला. क्लासने पालकांनी ही केलेला फॉर्म दाखविला, भरलेली फी परत केली जाणार नाही, अशी तरतूद फॉर्ममध्ये आहे आणि त्यावर पालकांनी सही केली आहे. त्याशिवाय विद्यार्थिनीने आपण कॉमर्समध्ये प्रवेश घेण्याचे सांगून फी परत मागितली. पण प्रवेशाचे कोणतेही पुरावे दाखविले नाही, असा युक्तिवाद क्लासतर्फे करण्यात आला. (Coaching Classes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community