भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या नक्षलवादाच्या खात्माबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी मोठा दावा केला आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशातील नक्षलवादाची समस्या संपुष्टात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. छत्तीसगडचा (Chhattisgarh) एक छोटा भाग वगळता संपूर्ण देश या धोक्यापासून मुक्त झाला असल्याचा दावा त्यांनी केला. (Amit Shah)
नक्षल कॉरिडॉरमध्ये माओवाद्यांची उपस्थिती नाही: शाह
शाह म्हणाले की, पशुपतीनाथ ते तिरुपती (Pashupatinath Tirupati) या तथाकथित नक्षल कॉरिडॉरमध्ये माओवाद्यांची उपस्थिती नाही. ते म्हणाले, ‘देशातून नक्षलवाद संपत आहे. कधीकाळी काही लोक पशुपतीनाथ ते तिरुपती या नक्षल कॉरिडॉरबद्दल (Naxal Corridor) बोलत असत. आता झारखंड पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. बिहार पूर्णपणे मुक्त झाला. ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाले आहेत. (Naxalism)
शाह म्हणाले, ‘छत्तीसगड पूर्णपणे मुक्त झालेला नाही आणि तेथे काही भागात नक्षलवादी अजूनही सक्रिय आहेत कारण गेल्या पाच वर्षांपासून राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. भाजपा सरकारने पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्ता हाती घेतल्यापासून छत्तीसगडला नक्षलमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. असे विधान गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
१२५ नक्षलवादी ठार, ३५२ हून अधिक अटक
‘आमचे सरकार आल्यापासून (छत्तीसगडमध्ये) सुमारे १२५ नक्षलवादी मारले गेले आहेत, ३५२ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे आणि सुमारे १७५ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. शनिवारपर्यंत आकडेवारीही मोजली तर सुमारे २५० जणांनी आत्मसमर्पण केले आहे. इथे मी फक्त गेल्या पाच महिन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलत आहे. असे मत अमित शाह यांनी केले. तसेच पुढील दोन किंवा तीन वर्षात देश नक्षल समस्येपासून मुक्त होईल, असे अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितले. (Amit Shah)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community