दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. आम आदमी पक्षाचे संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांच्यावर त्यांनी मारहाणीचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर ‘आप’ पक्ष आणि स्वाती मालीवाल यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहेत तसेच प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे त्यांना येणाऱ्या धमक्यांत वाढ झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.
After the leaders and volunteers of my party i.e. AAP orchestrated a campaign of charachter assassination, victim shaming and fanning of emotions against me, I have been getting rape and death threats.
This got further exacerbated when YouTuber @Dhruv_Rathee posted a one-sided… pic.twitter.com/EfCHHWW0xu
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) May 26, 2024
स्वाती मालिवाल यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडिया “X”वर पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “माझ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझे चारित्र्यहनन करण्याची मोहीम उघडली. त्यानंतर आता माझ्याबद्दल अश्लील कमेंट करणे, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू केले आहेत.
(हेही वाचा – IPL 2024: मुंबई ते राजस्थान २०२३ पर्यंत किती संघांनी जिंकले आयपीएल)
स्वाती मालीवाल पुढे म्हणाल्या, ध्रुव राठीसारखा एक मुक्त पत्रकार आम आदमी पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखा वागत आहे. त्यामुळे मी पीडित असूनही मला अत्यंत खालच्या दर्जाच्या कमेंट आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे.
“मी तक्रार मागे घ्यावी, यासाठी माझा पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मला धमकावण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे तसेच ध्रुव राठीला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने माझ्या कॉल आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष केले”, असेही स्वाती मालीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही पहा –