मुंबईतील नालेसफाईचे काम सध्या जोरात सुरु असून महापालिकेचे अधिकारी विशेष लक्ष देऊन ही सफाई योग्य प्रकारे होईल अशाप्रकारे करुन घेत आहेत. त्यामुळे नालेसफाई योग्य प्रकारे होत असल्याने मागील वर्षीप्रमाणे यंदाही पाणी तुंबले जाणार नाही. मात्र, ज्या भागांमध्ये यंदा पाणी तुंबले जाईल, त्या भागातील काम चांगले झाले नाही असा समज करून कारवाई करायला शासन मागे पाहणार नाही असा गर्भित इशाराच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या, मोठ्या नाल्यांसह खासगी जागांमधून जाणाऱ्या नाल्यांची सफाई योग्यप्रकारे व्हावी यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहूनच काम केले पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले आहे. (Water Logging)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शहरातील जे के केमिकल्स नाला, आणिक वडाळा मार्ग कर्ल्वट, भक्ती पार्क मोनोरेल स्थानकापासून या नालेसफाईच्या पाहणीला सुरुवात केली आणि चुनाभट्टी एटीआय नाला, वांद्रे कुर्ला संकुलातील मिठी नदी, जोगेश्वरी मजास नाला, दहिसर नदी आदींची पाहणी केली. याप्रसंगी स्थानिक आमदार तसेच महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, तसेच सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यासह पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून मी स्वत: पाच ठिकाणच्या नाल्यांची पाहणी केली. या नालेसफाईच्या कामांसाठी ५४२५ वाहनांचा वापर केला जात असून अनेक ठिकाणी पाणी तुंबले जावू नये आणि त्या पाण्याचा वेळीच निचरा व्हावा यासाठी ४८२ पंप बसवण्यात आले आहेत. (Water Logging)
(हेही वाचा – Lok Sabha Elections : संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांवर ‘निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप’)
पाहणी केलेले नाले असले तरी पूर्वी या नद्या होत्या. पूर्वी या नद्यांमध्ये लोक आंघोळ करायचे, एवढेच नाही तरी आज नाले बनलेल्या नद्यांमध्ये बैजू बावरा यांचेही चित्रीकरण झाले होते. परंतु मलवाहिनीतील पाणी या नदीत जावून ते नाले बनले गेले आहेत. त्यामुळे मल-जल प्रक्रिया केंद्रातील शुध्द केलेले पाणी आता समुद्रात सोडले जाणार असून त्यामुळे समुद्रातील जल प्रदूषण कमी करण्यात यश मिळणार आहे, तसेच आता नाल्यामध्येही मलमिश्रित पाणी जाणार नाही याची काळजी घेतली जाणार असून याच प्रकारे नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया केले जाणार असल्याने भविष्यात नाल्यातील पाणीही शुध्द झालेले पहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. (Water Logging)
दरड क्षेत्रातील कुटुंबांचे पावसाळ्यापुरते पक्क्या घरांमध्ये पुनर्वसन
मुंबईत पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेता महापालिकेच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटीस बजावून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीही होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण बैठक घेतली असून दुर्घटनेमुळे कोणतीही जिवित किवा मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून अशा धोक्याच्या ठिकाणच्या कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन शालेय इमारती किंवा शेडमध्ये न करता एमएमआरडीएच्या (MMRDA) प्रकल्प बाधितांच्या घरांमध्ये केले जावे. पावसाळ्या अगोदर कोणत्या प्रकारची कामे करता येतील याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांसह सर्वांना सूचना करून दरडीचा भाग कोसळणार नाही अशाप्रकारे संरक्षित होती. त्यामुळे दरडीच्या परिसरातील तात्पुरती व्यवस्था एमएमआरडीएच्या घरांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. जिवापेक्षा काहीही मोठे नाही. त्यामुळे धोका आहे तिथल्या लोकांनी पक्क्या घरांमध्ये तात्पुरत्या पुनर्वसनासाठी सहकार्य करावे असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिले. (Water Logging)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community