Water Logging : महापालिकेत यापूर्वी नालेसफाईच्या नावावर तिजोरीची सफाई, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

357
Water Logging : महापालिकेत यापूर्वी नालेसफाईच्या नावावर तिजोरीची सफाई, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

सध्या मुंबईतील नालेसफाईचे काम आम्ही करत असून काहींनी तर आजवर मेट्रीक टन गाळाच्या नावावरच महापालिकेच्या तिजोरीतच हात की सफाई केली आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापालिकेतील यापूर्वीचे सत्ताधारी उबाठा शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर तोंडसूख घेतले. आम्ही महापालिका हाती घेतल्यापासून मुंबईत पाणी तुंबले नाही. त्यामुळे नालेसफाईची चिंता त्यांनी करू नये, ती चिंता त्यांनी आमच्यावर सोडावे असेही त्यांनी सांगितले. (Water Logging)

लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) महाराष्ट्रातील पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडला असून मतदानाच्या सहा ते सात दिवसांनंतर उबाठा शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी महायुतीवर राजकीय आरोप करत वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) असे आरोप करण्यास एवढे दिवस का लागले, २० तारीख झाली की असा सवाल केला. आता आम्ही नालेसफाई करतो, ज्यांना महापालिकेची तिजोरी साफ करण्याची सवय लागली त्यांना अशी विकासकामे कशी दिसणार असा सवाल केला. (Water Logging)

(हेही वाचा – Cyclone Remal चा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाची सुसज्जता)

खड्डे दुरुस्तीच्या नावावर सुमारे ३ हजार कोटींचा खर्च

आजवर नाल्यातील एवढ्या मेट्रीक टन गाळाच्या नावावर तिजोरीची सफाई केली गेली असा सवाल करत मागील अनेक वर्षांपासून खड्डे दुरुस्तीच्या नावावर सुमारे ३ हजार कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे वेळीच झाली असती तर खड्ड्यांच्या नावावर कोट्यवधींचा खर्च झाला नसता आणि खड्डयांमुळे लोकांचे बळीही गेले तसेच लोकांना चांगल्या दर्जाचे रस्ते मिळू शकले असतील. (Water Logging)

परंतु आम्ही आता येत्या दोन वर्षांत मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देणार आहोत. रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून पुढील दोन वर्षांत ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करत मुंबईचे रस्ते खड्डे मुक्त होतील असे सांगितले. (Water Logging)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.