सायन रुग्णालयाच्या (Sion Hospital) आवारात झालेल्या अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेले डॉक्टर राजेश डेरे यांची भोईवाडा न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. सायन रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर डेरे यांच्या वाहनाच्या धडकेत शुक्रवारी रात्री एक महिलेचा मृत्यू झाला होता, या अपघाताप्रकरणी सायन पोलिसांनी (Sion Police) शनिवारी डॉक्टर डेरे यांना अटक केली होती. (Sion Hospital Accident)
डॉक्टर राजेश डेरे हे सायन रुग्णालयातील शव विच्छेदन विभागाचे प्रमुख आहे, शुक्रवारी रात्री डॉक्टर डेरे हे रुग्णालयातून स्वतःच्या मोटारीने घरी जाण्यासाठी निघाले असता रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ जवळील ओपीडी येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या रुबेदा शेख (६०) या महिलेच्या अंगावरून डेरे यांची मोटार गेल्याने ती जखमी झाली होती. डॉक्टर डेरे यांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Sion Hospital Accident)
(हेही वाचा – Department of Meteorology: पुढील २४ तासांमध्ये मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज, कोकणातील पर्यटन रविवारपासून बंद)
उपचार सुरू असताना रुबेदा शेख या महिलेचा शनिवारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी सायन पोलिसांनी डॉ. राजेश डेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. रविवारी डॉ. डेरे यांना भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान डॉ. डेरे यांच्या वकिलांनी न्यायालयात डॉ. डेरे यांच्या जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करून त्यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. (Sion Hospital Accident)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=9Flu8p-lXcc
Join Our WhatsApp Community