वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी अनेकविध साहित्य लिहिले, समाजप्रबोधनाचे कार्य केले, विज्ञाननिष्ठा मांडली, असे वीर सावरकर यांचे बहुआयामी व्यक्तित्व होते. त्यांचे व्यक्तित्व आपल्याला आता प्रसंगीक वाटू लागले आहे का? याचा विचार झाला पाहिजे. सावरकर यांच्याविषयी असलेल्या प्रेमापोटी आपण सर्वजण अशा कार्यक्रमांना उपस्थित राहत असतो. पण सावरकर आपण जगतो का? असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. वीर सावरकर यांच्यावर आपण लेख लिहितो, काव्य करतो, पण वीर सावरकर यांनी समजप्रबोधनाचे जे कार्य केले ते कशासाठी केले, हे लक्षात ठेवत नाही. वीर सावरकर यांनी भाषाशुद्धी, विदेशी राजनीति, संरक्षण व्यवस्था, संसदीय कामकाजासंबंधी संज्ञा असे अनेकविध स्वरूपाचे कार्य केले आहे. वीर सावरकर या शब्दाला अटल बिहारी वाजपेयी यांनी नवी व्याख्या दिली. त्यामुळे सावरकर हे नुसते आडनाव राहिले नाही तर ते जगण्याचा हेतु बनले आहे, असे गौरवोद्गार बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिले जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण रविवार, 26 मे रोजी उत्साही वातावरणात करण्यात आले. स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासह आयआयटी इंदूरचे डॉ. सुहास जोशी, सावरकर विचार प्रसारक संस्थेचे विद्याधर नारगोळकर आणि ‘स्वातंत्र्यवीर’ चित्रपटाचे निर्माते, लेखक, अभिनेते रणदीप हुड्डा उपस्थित होते.
(हेही वाचा Veer Savarkar : सैनिकीक्षमता कमी झाल्याने १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या देशाच्या डोक्यावर बसले – रणजित सावरकर)
गुलामीच्या मानसिकतेतून नव्या पिढीने बाहेर पडावे
आजचा दिवस वेगळा आहे. दोन वर्षे मी अशा कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करत होतो, आज तो योग आला आहे. ज्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांना वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या नावाने या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी जे काम केले ते समाजासमोर येणे आवश्यक असते, ज्यांनी सत्कार्य केले ते सत्काराला पात्र असतात. वीर सावरकर यांनी देशाला दिशा दिली, विचारांना प्रतिष्ठा दिली. काळ्यापाण्याची शिक्षा भोगली, हे सर्व आपण जाणतो. माझी जन्मठेप ज्यांनी वाचली नाही असा कुणी विराळाच असेल. भारतमातेसाठी वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी जे जे शब्द वापरले ते त्यांनी स्वतः जगले. आज वीर सावरकर यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह बोलले जाते, म्हणून आपल्याला वीर सावरकर समाजापुढे आणायला हवे, त्यासाठी चित्रपट, लेखन, काव्य या माध्यमातून ते आपल्या पिढीसमोर मांडले पाहिजे. आपली गुलामीत राहण्याची मानसिकता बनली आहे. नोकरी करणे ही ती मानसिकता आहे, या मानसिकतेतून नवीन पिढीने बाहेर पडायला हवे. आपली सांस्कृतिक, विजयाची परंपरा आहे. आपली परंपरा पराभवाची नाही तर विजयाची आहे, हे नव्या पिढीच्या मनामध्ये कोरले पाहिजे, असेही राज्यपाल आर्लेकर म्हणाले.
(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार जाहीर)
पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य हा वीर सावरकरांचा विचार
वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी विकसित भारताचे जे चित्र मांडले होते, तोच विचार आणि लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. विकसित, समृद्ध भारताचे लक्ष्य वीर सावरकर यांचे होते, हा वारसा येणाऱ्या पिढीसमोर आपण ठेवला पाहिजे. आपल्या देशाला ‘सोनेकी चिडिया’ नव्हे तर ‘सोनेका शेर’ बनवायचा आहे, ज्याची गर्जना जगभरात पसरली पाहिजे, सावरकर यांनी यासाठी यातना भोगल्या आहेत. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून वीर सावरकर यांचे चिंतन, विचार, आचार समाजासमोर मांडले पाहिजे. आज वीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलले जात आहे. म्हणून आपल्याला वीर सावरकर पराक्रमी, वीर होते, ही येणाऱ्या पिढीसमोर आणले तर येणारी पिढी वीर सावरकर यांच्या विरोधात कधी बोलणार नाही, असे राज्यपाल आर्लेकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community