लष्कर प्रमुख जनरल Manoj Pandey यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ

मनोज पांडे यांना भारतीय लष्कराचा प्रदीर्घ अनुभव आहे. मनोज पांडे यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीत इंजिनिअर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माऊंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे.

160
लष्कर प्रमुख जनरल Manoj Pandey यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ

भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. मात्र. आता त्यांचा कार्यकाळ संरक्षण मंत्रालयाने एक महिन्याने वाढवला आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने रविवारी (२६ मे) लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या सेवेत एक महिन्याची मुदतवाढ मंजूर केली आहे. मनोज पांडे हे ३१ मे २०२४ रोजी निवृत्त होणार होते, परंतु आता मनोज पांडे हे ३० जून २०२४ पर्यंत सेवारत राहतील असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. मनोज पांडे (Manoj Pandey) ३० एप्रिल २०२२ पासून लष्करप्रमुख पदावर कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २६ मे २०२४ रोजी लष्करी नियम १९५४ च्या नियम १६ अ (४) अंतर्गत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या सेवेत एक महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ मंजूर केली आहे. (Manoj Pandey)

मूळचे नागपूर येथील असलेले मनोज पांडे यांना भारतीय लष्कराचा प्रदीर्घ अनुभव आहे. जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीत इंजिनिअर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माऊंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती. मनोज पांडे (Manoj Pandey) हे देशातील पहिले इंजिनियर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखांची कमान सोपवण्यात आली आहे. (Manoj Pandey)

(हेही वाचा – Veer Savarkar : ‘सावरकर’ हे नुसते आडनाव राहिले नाही, तर जगण्याचा हेतू बनले; राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे गौरवोद्गार)

मनोज पांडे (Manoj Pandey) यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरच्या वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावी नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी डेहराडूनमधील मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली (ब्रिटन) स्टाफ कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी ‘हायर कमांड कोर्स’ केला आहे. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये देखील सक्रियरीत्या सहभागी झाले होते. (Manoj Pandey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.