रवी शास्त्री (Ravi Shastri) हे भारतीय क्रिकेट टीमचे माजी कोच आणि क्रिकेट कॉमेंट्रीटर आहेत. लेफ्टी फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला ते फक्त गोलंदाजी करण्यात तरबेज असले तरी त्यांनी कालांतराने आपली फलंदाजी सुधारण्यासाठीही खूप मेहनत घेतली आणि ते यशस्वीही झाले. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. (Ravi Shastri)
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा जन्म २७ मे १९६२ साली मुंबईत झाला. एक खेळाडू म्हणून ते १९८१ ते १९९२ सालादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने अनेक कसोटी सामने आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला. त्यावेळी रवी शास्त्रीसुद्धा त्या संघाचा खेळाडू म्हणून खेळले होते. (Ravi Shastri)
(हेही वाचा- Veer Savarkar : ‘सावरकर पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली’ – डॉ. सुहास जोशी)
रवी शास्त्री (Ravi Shastri) हे डिफेन्सीव्ह खेळायचे पण ते त्यांचा स्ट्राईक रेट सहजपणे वाढवू शकत होते. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची उंची सरासरीपेक्षा जास्त आहे. ते ६.३” उंच आहेत. त्यांच्या उंचीमुळे आणि सरळ स्टँसमुळे त्यांना वेगवान गोलंदाजीच्या विरोधात उत्तर देण्यासाठी मर्यादित शॉट्स मारायचे. पण समोरुन फिरकी गोलंदाजी टाकली गेली तर ते उंच शॉट्स मारायचे. रवी शास्त्री (Ravi Shastri) नेहमी ओपनिंग बॅट्समन म्हणून किंवा मिडलला खेळायला यायचे. (Ravi Shastri)
१९८५ साली ऑस्ट्रेलिया येथे भरवण्यात आलेल्या ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ सामन्यांमध्ये रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ म्हणून निवडण्यात आलं होतं. तो त्यांच्या कारकीर्दीतला अविस्मरणीय क्षण होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी रवी शास्त्री हे राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळले होते. त्यावेळी त्यांनी रणजी ट्रॉफीसुद्धा जिंकली होती. रवी शास्त्री निवृत्त झाल्यानंतर कॉमंटेटर म्हणून आजही क्रिकेट विश्वात सक्रियपणे वावरतात. त्यांच्या इंग्रजीने अनेकांना भुरळ घातली आहे. (Ravi Shastri)
(हेही वाचा- लष्कर प्रमुख जनरल Manoj Pandey यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ)
दरवर्षी NAMAN नावाचा भारतीय क्रिकेट संघाचा वार्षिक पुरस्कार सोहळा भरवण्यात येतो. १ जानेवारी २०२४ साली या पुरस्कार सोहळ्यामध्ये रवी शास्त्री यांना सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. (Ravi Shastri)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community