महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) कोकण पदवीधरसाठी (Vidhan Parishad Election 2024) उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election 2024)
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. @abhijitpanse pic.twitter.com/HhDzeihyde
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 27, 2024
मनसेनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.” (Vidhan Parishad Election 2024)
ही उमेदवारी मनसेची की महायुतीची ?
मात्र, आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची आहे की महायुतीची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोकण पदवीधरमधून (Vidhan Parishad Election 2024) डावखरे हे भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतोय, त्याच जागेवर मनसेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. (Vidhan Parishad Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community