Sassoon Hospital : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर, कल्याणीनगर अपघातात ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात

202
Sassoon Hospital : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर, कल्याणीनगर अपघातात ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात
Sassoon Hospital : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर, कल्याणीनगर अपघातात ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात
ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणानंतर पुण्यातील ससून रुग्णालय (Sassoon Hospita) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघात (Kalyani Nagar accident) प्रकरणी सोमवारी पुणे गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावरे (Dr. Ajay Taware) आणि डॉ.श्रीहरी हलनोर (Dr. Srihari Halnor) यांना अटक केली आहे. कल्याणीनगर पोर्स अपघातानंतर आरोपीचे घेण्यात आलेले रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याचा आरोप ठेवत या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ललित पाटील ड्रग्स प्रकरणात ससून रुग्णालयाचे (Sassoon Hospita) अधिष्ठाता यांचा सहभाग समोर आला होता. (Sassoon Hospita)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणी नगर (Kalyani Nagar accident) येथे झालेल्या पोर्स मोटारीच्या अपघातानंतर पोलिसांनी सकाळी आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी ससून रुग्णालयात आणले होते, त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, आरोपीने वाहन चालवताना अल्कोहोल किंवा अमली पदार्थ घेतले होते का याची तपासणी करण्यासाठी आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.ससून रुग्णालयातील (Sassoon Hospita) डॉक्टर श्रीहरी हलनोर (Dr. Srihari Halnor) आणि डॉ अजय तावरे (Dr. Ajay Taware) या डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. परिणामी, रक्ताचा अहवाल बदलला गेला, आणि संभाव्यपणे केसचा मार्ग बदलला. (Sassoon Hospita)
सुदैवाने पोलिसांनी आरोपीच्या रक्ताचे दुसरे नमुने घेतले आणि डीएनए चाचणी केली. या तपासणीत संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. गुन्हे शाखेने काटेकोरपणे कारवाईचे नियोजन करून सोमवारी पहाटे डॉ. तावरे (Dr. Ajay Taware) आणि डॉ.हलनोर (Dr. Srihari Halnor) यांना त्यांच्या घरातून अटक केली. या कारवाईने पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Sassoon Hospita)
यापूर्वी ललित पाटील ड्रग माफिया प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांचा सहभाग उघडकीस आला होता. अशा घटना घडूनही ससून रुग्णालयातील गैरप्रकार सुरूच आहेत. डॉक्टर अजय तावरे यांना नुकतेच उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. तरीही, डॉ. तावरे यांनी रक्ताचे नमुने बदलून कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींना मदत केली. डॉ. तावरे (Dr. Ajay Taware) आणि डॉ. हलनोर (Dr. Srihari Halnor) यांना त्यांच्या कृत्यासाठी मोठी रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. त्यांच्याशी संपर्क साधून आर्थिक व्यवहार कोणी केले याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. (Sassoon Hospita)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.