पुणे अपघात प्रकरणी (Pune Car Accident) अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यासोबतच अग्रवाल कुटुंबाची जुनी काही प्रकरणंही समोर येत आहेत. यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले (Ajay Bhosale) यांनी पुढे येत अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. अशातच, आता आणखी एक तक्रारदार पुढे आले आहेत. दत्तात्रय कातोरे अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे (Dattatraya Katore) यांनी केला आहे. (Pune Car Accident)
(हेही वाचा –Sassoon Hospital : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर, कल्याणीनगर अपघातात ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात)
तक्रारदार कातोरे अग्रवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचं काम करत होते. काम पूर्ण झाल्यानंतरही कातोरेंना अग्रवाल बिल्डर्सकडून पैसे देण्यात आले नव्हते. कातोरेंना अग्रवालांकडून तब्बल 84 लाख 50 हजार रुपयांचं येणं होतं. सातत्यानं पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदार दत्तात्रय कातोरेंचा मुलगा शशी कातोरे यानं जानेवारी महिन्यात आत्महत्या केलेली. याप्रकरणी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रय कातोरे पोलिसांना तक्रार देणार आहेत. (Pune Car Accident)
(हेही वाचा –Remal Cyclone बंगालला धडकले! राज्यात परिस्थिती काय?)
दरम्यान, पुणे पोलिसांच्या अहवालानुसार, अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आतापर्यंत दोन तक्रारदार पुढे आले आहेत. यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. अजय भोसले यांनी तक्रार केल्यानंतर अग्रवाल बिल्डर्सचं अंडरवर्ड कनेक्शनही समोर आलं होतं. (Pune Car Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community