दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल म्हणाले की, त्यांना गंभीर आजार आहे आणि त्यांचे पीईटी-सीटी स्कॅन करावे लागेल. (Arvind Kejriwal)
सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि २ जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले होते की, केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत, मात्र त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. केजरीवाल समाजासाठी धोका नाहीत. (Arvind Kejriwal)
(हेही वाचा – Sassoon Hospital : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर, कल्याणीनगर अपघातात ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात)
न्यायालयाने केजरीवाल यांना ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या २ जामीनदारांवर जामीन मंजूर केला. यापूर्वी २१ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर ईडीने त्यांना रात्री उशिरा अटक केली होती.
हेही पहा –