ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानंतर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षासमोर (Conservative Party) समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षातील खासदारांचे राजीनामे सुरूच आहेत. त्यामुळे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. ब्रिटिश (Britain) संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये एकूण 650 खासदार आहेत. आतापर्यंत एकूण 122 ब्रिटिश खासदारांनी पुढील निवडणुका लढवण्यास नकार दिला आहे. 2010 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने ही सर्वांत मोठी संख्या आहे.
काही खासदारांनी राजकारण सोडून अन्य व्यवसायात चांगले करिअर केले आहे, तर काही खासदारांनी तणावाच्या राजकारणापासून दूर राहण्यासाठी पुढील निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Sassoon Hospital : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर, कल्याणीनगर अपघातात ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात)
कोणी कोणी दिला राजीनामा
अलीकडेच टोरी पक्षाचे जुने नेते मायकेल गोव्ह आणि आंद्रे लीडसम यांनी राजकारणाला अलविदा केले आहे. त्यामुळे राजकारणातून निवृत्त झालेल्या सुनक यांच्या पक्षातील एकूण खासदारांची संख्या 78 झाली आहे. मायकेल गोव्ह यांच्या आधी संरक्षणमंत्री बेन वॉलेस, माजी पंतप्रधान थेरेसा मे, साजिद जाविद, डॉमिनिक राब, मॅट हॅनकॉक, नदिम झहावी या दिग्गजांनीही पुढील सार्वत्रिक निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. डायना अँडरसन, निकोला रिचर्ड्स, मैरी ब्लॅक यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ॲलन व्हाइटहेड आणि हॅरिएट हरमन यांच्यासह विरोधी मजूर पक्षाच्या एकूण 22 खासदारांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. यापूर्वी 2019 मध्ये हा आकडा 74 होता. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केवळ 31 खासदार आणि 2015 च्या निवडणुकीपूर्वी 90 खासदारांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.
काय आहेत कारणे
ब्रिटिश खासदारांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील कंझर्व्हेटिव्ह पक्षाची (Conservative Party) खराब स्थिती. अनेक टोरी खासदारांना खात्री आहे की त्यांनी पुढची निवडणूक लढवली तर त्यांचा पराभव होईल. अशा परिस्थितीत ते पुन्हा निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीत.
याशिवाय अनेक खासदारांचे वाढते वय हे महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या वयामुळे अनेक खासदारांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही खासदार असे आहेत ज्यांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे, पण त्यांना पुन्हा निवडणूक लढवायची नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community