राजकोट अग्नितांडव प्रकरणात Gujarat High Court ची महत्त्वाची टिप्पणी!

126
राजकोट अग्नितांडव प्रकरणात Gujarat High Court ची महत्त्वाची टिप्पणी!
राजकोट अग्नितांडव प्रकरणात Gujarat High Court ची महत्त्वाची टिप्पणी!

राजकोट येथील गेम झोनमध्ये भीषण आगीत (Gujarat High Court) २७ जणांचा मृत्यू आणि तीन जखमी झाल्याची घटना शनिवारी (25 मे) घडली होती. आगीप्रकरणी रविवारी पहाटे राजकोट तालुका पोलिसांनी धवल कॉर्पोरेशनचे मालक धवल ठक्कर, रेसवे एंटरप्राइझचे भागीदार अशोकसिंह जडेजा, किरीटसिंह जडेजा, प्रकाशचंद हिरण, युवराजसिंह सोलंकी, नितीन जैन आणि राहुल राठोड आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Gujarat High Court)

(हेही वाचा –Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने ‘या’ तारखेपासून बंद, कारण काय ?)

गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने (Gujarat High Court) राजकोट गेम झोन आगीची स्वत:हून दखल घेत ही प्रथमदर्शनी ‘मानवनिर्मित आपत्ती’ असल्याचे म्हटले आहे. शहरातील असे गेमिंग झोन आणि करमणूक सुविधा सक्षम अधिकाऱ्यांच्या आवश्यक मंजुरीविना निर्माण झाल्या आहेत, असे निरीक्षण न्यायमूर्ती बीरेन वैष्णव आणि देवन देसाई यांच्या खंडपीठाने नोंदवले. खंडपीठाने अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोट महापालिकांच्या वकिलांना कायद्याच्या कोणत्या तरतुदींनुसार या गेमझोनची स्थापना केली किंवा त्यांच्या अधिकारक्षेत्रात सुरू ठेवले, यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. (Gujarat High Court)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला लोकसभेपेक्षा हिमाचलमधील सरकारची जास्त काळजी, कारण? वाचा सविस्तर…)

यात युवराजसिंह सोलंकी आणि नितीन जैन यांना अटक करण्यात आल्याची माहिती राजकोटचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) पार्थराजसिंह गोहिल यांनी दिली. गेमझोनमध्ये योग्य अग्निशमन उपकरणे नव्हती आणि स्थानिक अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) घेतले नव्हते, त्यामुळे इमारतीत आगीमुळे भीषण घटना घडू शकते हे माहीत असूनही नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (Gujarat High Court)

(हेही वाचा –Britain : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी 78 खासदारांची राजकारणातून निवृत्ती)

घटनेची चौकशी करून ७२ तासांत अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय ‘एसआयटी’ने शनिवारी रात्री उशिरा राजकोट गाठून स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली. घटनेतील मृतदेहांची ओळख पटवणे आव्हानात्मक होते. ओळखीसाठी मृतदेह आणि पीडितांच्या नातेवाईकांचे ‘डीएनए’ नमुने गोळा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. (Gujarat High Court)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.