‘गुड मॉर्निंग’ या शब्दाचे शब्दश: भाषांतर ‘शुभ सकाळ’ असे होते. याव्यतिरिक्त सुप्रभात, राम राम, राम कृष्ण हरि, जय हरि, जय श्री राम …अशा शब्दांत अभिवादन करण्याची पद्धत आहे. मराठीमध्ये असे विविध शब्द सकाळी वापरून दिवसाची सुरुवात केली जाते. याव्यतिरिक्त काही जण फक्त हसूनही दिवस चांगला जावा, यासाठी अभिवादन करतात. (Good Morning Marathi)
आपल्या जवळच्या माणसांनी ‘गुड मॉर्निंग’ मेसेज केला की, दिवस आनंदात, मजेत जातो. सकाळच्या शुभेच्छा, स्टेटस, मेसेजेस, सुविचार, संदेश, कोट्स, एसएमएस…जोडीदार, मित्रमैत्रिणींना पाठवले जातात, मात्र काही वेळा नक्की काय शुभ संदेश सकाळी पाठवायचे, असा प्रश्न पडतो. कधी कधी फक्त सुप्रभात, शुभ सकाळ असेही टाईप करून पाठवले जाते. अशावेळी एकमेकांची सकाळ सुखकर, आनंददायी करण्यासाठी मराठीमध्ये सुप्रभात सांगण्याचे ५ वेगवेगळे मार्ग कोणते? पाहूया – (Good Morning Marathi)
(हेही वाचा – Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्याच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू)
मेसेजेस –
– आपला दिवस सुखाचा जावो.
– प्रत्येक दिवस नवा असतो, अप्रतिम आणि सुंदर आठवणींनी आजचा दिवस सजावा
– आयुष्य एक कोरी पाटी आहे आणि त्यावर तुम्ही जे लिहाल तेच तुम्हाला पुढे दिसेल. असाच आपला दिवस सजवा.
– भूतकाळ हा आठवणींसाठी असतो, भविष्यकाळ हा कल्पनांसाठी असतो. पण वर्तमान हा आपल्याला मिळालेलं वरदान आहे. हे वरदान आजच्या दिवसाने सार्थ ठरवा.
– चेहऱ्यावर सुंदर हास्य ठेवून करा दिवसाची सुरुवात
कुटुंबियांना मेसेजेस –
– मी आज मलाच हसताना पाहिलं आणि जाणवलं की, हे हसू फक्त तुझ्या आठवणीने आलं आहे
– इतर सगळ्यांमधून मी फक्त तुला निवडलं आहे. सकाळीच तुला बघून दिवस खूप सुंदर जातो
– झालास का झोपेतून जागा? तुझ्या उठण्याचीच वाट पाहात आहे. तुझ्या मेसेजने माझा दिवस खूपच चांगला जातो
– गुड मॉर्निंग, तू म्हणजे माझ्यासाठी माझं जग आहेस. तुझा दिवस असाच सुंदर जावो.
– आज तुझी आणि भेट होणार हा सर्वात सुंदर दिवस असतो माझ्यासाठी
कोट्स –
– दुसऱ्यांना माफ करा कारण तसं केल्याने तुमचं मन शांत राहील.
– आयुष्य खूप लहान आहे, जगून घ्या. प्रेम मिळणं दुर्मिळ आहे ते मिळवा, राग वाईट आहे तो सोडून द्या आणि सुखाने आपली सकाळ आनंदी करा.
– आनंदी मन हे यशाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे.
– या जगात कोणीच परफेक्ट नसतं त्यामुळे लहान लहान चुकांकडे दुर्लक्ष करायला शिका.
-लहान गोष्टींनी नाराज होऊ नका…आपलं लक्ष्य मोठं ठेवा
मित्रमैत्रिणींना मेसेजेस –
– तुमच्या आयुष्यात इतकी सुखं येवोत की, तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासो.
– ही सकाळ जितकी सुंदर आहे, तितकंच तुमचं आयुष्यही सुंदर होवो.
– तुमचं आयुष्य या सकाळच्या आशादायी किरणांप्रमाणेच उजळून जावो ही कायम ईश्वरचरणी प्रार्थना.
– ही नवी सकाळ तुम्हाला लाभदायी ठरो, कारण तुमच्या सर्वात जवळच्या मित्राकडून आज तुम्हाला सकाळचा हा मेसेज आला आहे.
इतर सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि – आपली मैत्री एका बाजूला…कारण ती कोणत्याही गोष्टीत तोलता येणार नाही.
स्टेटस –
– सकाळची पहिली आठवण तू आहेस, प्रत्येक प्रार्थनेतील नाव तू आहेस, प्रत्येक दुःख दूर राहो तुझ्यापासून हीच माझी इच्छा आहे.
– रात्रीच्या उदरातून जेव्हा सूर्य उगवतो, तसं माझं प्रेम तुझ्यासाठी वाढत जातं.
– प्रत्येक सकाळी जेव्हा मी डोळे उघडतो तेव्हा मला सर्वात आधी तुला पाहायचं असतं. माझ्या मनात हीच प्रार्थना आहे की, तू सदा खुश रहावंस.
याव्यतिरिक्त ई-मेलद्वारेही सकाळी शुभप्रभात, सुप्रभात किंवा शुभ सकाळ …अशा शुभेच्छा आणि एखादा संदेश देता येऊ शकतो. अनपेक्षितपणे एखाद्याने तुमचा हा ईमेल सकाळी पाहिल्याचं समोरच्या व्यक्तिचा दिवस आनंदात जाऊ शकतो.
हेही पाहा –