Railway News : ६९ मेल-एक्स्प्रेस रद्द

297
Railway News : ६९ मेल-एक्स्प्रेस रद्द

२४ डब्यांच्या रेल्वेगाड्या चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. विस्तारीकरणातील अखेरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केला आहे. ३१ मेच्या मध्यरात्री १२.३० ते २ जून रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Railway News)

ब्लॉकवेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ नये, यासाठी रद्द करण्यात येणाऱ्या गाड्यांचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. यामुळे लोकलवरील परिणामांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. भायखळा आणि वडाळा रोडवरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. (Railway News)

ब्लॉकवेळेत ६९ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द होणार असून ५० पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस विविध स्थानकांवर रद्द करण्यात येणार आहेत. ३६ तासांच्या वेळेत सीएसएमटी ते भायखळा धीम्या आणि जलदमार्गासह सीएसएमटी ते वडाळा रोड हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांवरही परिणाम होणार आहे. (Railway News)

३६ तासांच्या ब्लॉकमध्ये सीएसएमटीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या दादरमध्ये (२२), ठाण्यात (२). पनवेल (३), पुणे (५) आणि नाशिकमध्ये (१) गाडी रद्द करण्यात येणार आहे. याच वेळेत सीएसएमटी ऐवजी दादरवरून (२०) मेल-एक्सप्रेस, पनवेलहून (३), पुण्यातून (५) आणि नाशिकहून (१) गाडी रवाना होणार आहे. मेल-एक्सप्रेसच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (Railway News)

स्थानक – सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा

मार्ग – अप-डाउन धीमा, अप-डाउन जालाद, अप-डाउन हार्बर

वेळ – ३१ मे मध्यरात्री १२.३० ते २ जून दुपारी १२.३० (Railway News)

कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई रत्नागिरी ते वैभववाडीदरम्यान कोकण रेल्वेने शुक्रवारी ३१ मे गोजी सकाळी ९.१० ते ११.४० दरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस दीड तास विलंबाने धावणार आहे. गाडी क्रमांक १२०५१ मुंबई-मडगाव जनशताब्दी चिपळणू ते रत्नागिरीदरम्यान ४० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२११९ मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीी स्थानकात २० मिनिटे थांबवण्यात येोगार आहे. यामुळे कोकण रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या ३१ मे रोजी विलंबाने धावणार आहेत. (Railway News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.