Sonia Doohan : शरद पवार गटातील महिला नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

Sonia Doohan : शरद पवार गटाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा (Dhiraj Sharma) यांच्या पाठोपाठ आता युवती अध्यक्ष सोनिया दुहान (Sonia Doohan) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत.

205
Sonia Doohan : शरद पवार गटातील महिला नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

मुंबईत अजित पवार (Ajit Pawar), सुनील तटकरेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक होत आहे. या बैठकीला विद्यमान मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, 2024 चे लोकसभा उमेदवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थिती आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राष्ट्रवादीची रणनिती ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीला सोनिया दुहान (Sonia Doohan) पोहोचल्या आहेत.

(हेही वाचा – Railway News : ६९ मेल-एक्स्प्रेस रद्द)

सोनिया दुहान यांनी आपल्याविषयीच्या चर्चा फेटाळल्या आहेत. असे असले, तरी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले असून सातत्याने पक्षप्रवेशाच्या बातम्या फेटाळणाऱ्या सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी मागच्या दरवाज्याने पोहोचल्या आहेत. संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून फारकत घेतल्याचे दिसून आले होते.

कोण आहेत सोनिया दुहान ?

सोनिया दुहान यांना शरद पवारांची (Sharad Pawar) ‘लेडी जेम्स बॉन्ड’ (Lady James Bond) म्हणून ओळखले जाते. सोनिया दुहान यांनी 2019 च्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दिल्ली विद्यापिठात दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्त्व केलं. त्या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष राहिल्या. त्यानंतर राष्ट्रीय महासचिव झाल्या. पक्षाच्या युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शरद पवारांना आपला गुरू मानतात.

का म्हणतात ‘लेडी जेम्स बाँड’?

पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर जी कामगिरी सोनिया दुहान यांना दिली होती, ती त्यांनी फत्ते केली. त्यानंतर त्या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातल्या तरुण सहकारी झाल्या, असेही बोलले जाते. भाजपाच्या गळाला लागलेल्या आमदारांना परत आणण्याचे काम सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी केले होते. त्यामुळे त्यांना लेडी जेम्स बाँड ही पदवी मिळाली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.