काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल एक वक्तव्य केलं. ते म्हणाले २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आमचा पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं आहे. शरद पवारांबरोबरच्या त्यावेळच्या चर्चेत मी देखील होतो. आमच्याबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशी सगळी वरिष्ठ मंडळी होती. आम्हा सर्वांना वाटत होतं की मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच असायला हवं. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो. मी त्यावेळचं सांगतोय… मला वाटत होतं की छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कोणी जर आमचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं असेल तर ते काम छगन भुजबळांनी केलं आहे. ही गोष्ट आमच्यापैकी कोणीही नाकारू शकत नाही, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
सुधाकरराव नाईक यांनी पवारांचे ऐकणे सोडून दिले
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आमच्यापैकी अनेकांना वाटत होतं की छगन भुजबळ हेच मुख्यमंत्री होतील. परंतु, शरद पवार यांनी भुजबळांना मुख्यमंत्री न करण्याचं मला माहीत असलेले कारण वेगळं आहे. त्याबद्दल मला जी बातमी मिळाली आहे… अर्थात माझी बातमी खरीच आहे… ती बातमी अशी आहे की यापूर्वी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केल्यावर अवघ्या एका वर्षात नाईक यांनी शरद पवारांचे ऐकणं सोडून दिले होते. एका वर्षाच्या आतच नाईक एका ठिकाणी म्हणाले, एखादं सावज माझ्या टप्प्यात आलं की मी ते सावज लगेच टिपतो… असं बरंच काही ते बोलून गेले होते. त्यानंतर छगन भुजबळांसह आम्हा १७ नेत्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. विजयसिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला त्यावेळी कळवलं होतं की तुम्हा १७ जणांना मंत्रिमंडळातून वगळलं आहे. तिथून ही सगळी गडबड सुरू झाली होती, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community