केमिकल इंजिनियर आणि न्यूक्लियर सायंटिस्ट Jyeshtharaj Joshi

154
केमिकल इंजिनियर आणि न्यूक्लियर सायंटिस्ट Jyeshtharaj Joshi

ज्येष्ठराज जोशी (Jyeshtharaj Joshi) यांचा जन्म २८ मे १९४९ साली महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या एका मसूर नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव भालचंद्र जोशी असं होतं. सगळे लोक त्यांना जोशी काका म्हणून ओळखायचे. (Jyeshtharaj Joshi)

ज्येष्ठराज जोशी (Jyeshtharaj Joshi) यांनी १९७१ साली मुंबईतल्या UDCT म्हणजेच युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इथून केमिकल इंजिनिअरिंग हा विषय घेऊन बी.इ. ही पदवी मिळवली. तर १९७२ साली त्यांनी त्याच विषयात एम.इ ची पदवी मिळवून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ज्येष्ठराज जोशी यांनी प्रसिद्ध केमिकल इंजिनियर मनमोहन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आपले संशोधन सुरू केले. ते पूर्ण झाल्यानंतर १९७७ साली ज्येष्ठराज जोशी यांना पी.एच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली. (Jyeshtharaj Joshi)

(हेही वाचा – PM Narendra Modi : आजकाल भ्रष्टाचाऱ्यांना खांद्यावर घेऊन…; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केजरीवालांवर हल्लाबोल)

इंजिनिअरिंग सायन्सेस क्षेत्रात ज्येष्ठराज जोशी यांना मिळाले ‘हे’ पारितोषिक 

ज्येष्ठराज जोशी (Jyeshtharaj Joshi) हे मुंबईत राहतात. त्यांच्या पत्नीचं नाव ऋजुता असं आहे. या दाम्पत्याला अनिरुद्ध नावाचा मुलगा आहे. त्याने मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पी.एच.डी. ही पदवी मिळवली आहे. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी हे एक प्रसिद्ध भारतीय केमिकल इंजिनियर, न्यूक्लियर सायंटिस्ट, कन्सल्टंट आणि प्रोफेसर आहेत. याव्यतिरिक्त ते त्यांनी तयार केलेल्या न्यूक्लियर रिऍक्टरच्या डिझाइन्ससाठी आणि एक चांगले प्रोफेसर म्हणूनही ओळखले जातात. (Jyeshtharaj Joshi)

ज्येष्ठराज भालचंद्र जोशी (Jyeshtharaj Joshi) हे मुंबईतल्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे ‘होमी भाभा चेअर प्रोफेसर’ आहेत. इंजिनिअरिंग सायन्सेस क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना ‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक’ देण्यात आलं आहे. तसेच केमिकल इंजिनिअरिंग आणि न्यूक्लियर क्षेत्रातल्या त्यांनी केलेल्या कामासाठी २०१४ साली भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मभूषण’ हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Jyeshtharaj Joshi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.