राज्य उत्पादन विभागावर आरोप करणे धंगेकर आणि अंधारेंचा स्टंट; मंत्री Shambhuraj Desai यांचा आरोप

246
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जात महाविकास आघाडीचे नेते, आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी प्रशासनातील अधिकारी हे वसुली करत असल्याचा आरोप केला. या आरोपांवर मंत्री शंभूराजे देसाई यांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर करावे. पुरावे न देताच ते केवळ आरोप करत असल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आपण धंगेकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे.
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केले असून या वेळी त्यांनी उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. जिल्हा प्रशासन वसुली करत असलेल्या हप्त्यांची यादीच सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवली. या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची वसुली केली जात असल्याचा आरोप आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात एकही पुरावा नसताना आरोप होत असल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले शंभूराज देसाई?

आमदार रवींद्र धंगेकर आणि उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादक शुल्क विभागात कार्यालयात जाऊन जो प्रकार केला, तो एक स्टंटचा भाग आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते शासनाकडे द्यावेत. जिल्हाप्रमुख म्हणून जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्त, शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे त्यांनी पुरावे द्यावेत. या सर्व प्रकरणाची कसलीही चौकशी करण्याची आमची तयारी आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलेले नाही. आजपर्यंत घातलेले नाही आणि या पुढेही घालणार नाही, अशा शब्दात मंत्री शंभूराजे (Shambhuraj Desai) यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर पलटवार केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.