Chhagan Bhujbal : ‘अब की बार…४०० पार’ घोषणेचा फटका बसला; काय म्हणाले भुजबळ

Chhagan Bhujbal : आधीच चारशे पार...चारशे पार ही घोषणा देण्यात आली आणि संविधान बदलणार हे दलित समाजाच्या मनावर इतके बिंबले की, ते काढता काढता नाकी नऊ आले, असे छगन भुजबळ म्हणाले.

276
सचिन कुर्मी हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्या; Chhagan Bhujbal यांची आयुक्तांकडे मागणी

मला आपल्याला सांगायचंय की, आधीच चारशे पार…चारशे पार ही घोषणा देण्यात आली आणि संविधान बदलणार हे दलित समाजाच्या मनावर इतके बिंबले की, ते काढता काढता नाकी नऊ आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका टीव्ही मुलाखतीत १५ ते २० मिनिटं हेच सांगत होते की, आम्ही संविधान बदलणार नाही, उलट संविधान दिन साजरा करणार आहोत. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्याला आताच्या निवडणुकीत जाणवला, अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपच्या घोषणेविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Ramdas Athavale : संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असून महायुतीमध्ये एकजूट – रामदास आठवले)

या निवडणुकीत (loksabha election 2024) भाजपकडून देण्यात आलेल्या ‘अब की बार, चारसो पार’ या घोषणेची मोठी चर्चा चालू आहे. देशात सत्तेत येण्यासाठी २७२ जागांचीच गरज असताना भाजप (BJP) ४०० पारचा नारा देत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचे आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही ‘अब की बार, चारसो पार’ या घोषणेचा निवडणुकीत आपल्याला फटका बसल्याची कबुली दिली.

जागावाटपावरही चर्चा

विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत,” अशी मागणी या वेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. याच मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांनीही जागावाटपाविषयी भाष्य केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.