भाद्रपद महिन्यात गणपती आगमनाचे वेध लागतात. त्यामागोमाग पूजा, आरती, मोदकाचा नैवेद्य…अशा शास्त्रानुसार करायच्या कृती केल्या जातात, मात्र या काळात इतर सर्व पूजोपचारांमध्ये ‘आरती’ हा मुख्य पूजा प्रकार आहे. आजही म्हणजे दैनंदिन जीवन कितीही गतिमान असले, तरीही कोट्यवधी लोकं आरती म्हणायला प्राधान्य देतात. घरोघरी या दिवसांत सकाळ-सायंकाळ गणपतीसह इतरही देवतांच्या आरत्या म्हटल्या जातात. यामध्ये गणपतीची आरती मुख्यत: म्हटली जाते.
आरती म्हणताना शब्दांच्या चुका नको…
– आरती म्हणताना काही वेळा शब्दांच्या चुका होतात. त्या होऊ नयेत, म्हणून मराठी आरत्यांचे पुस्तक बाजारात विकत मिळते. या पुस्तकांचा वापर करावा.
– आरत्यांवरून विनोद करू नये.
– आरतीतील शब्दांच्या अर्थाचीही माहिती मिळावा. यामुळे आरती म्हणताना ती भावपूर्ण म्हटली जाईल.
-पूजा, ओवाळणे, नैवेद्य या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो.
– आरती म्हणण्याकरिता काही ठिकाणी पेटी, तबला अशा वाद्यांचाही वापर केला जातो. यामुळे ताल आणि ठेका धरून म्हटलेली आरती पटकन लक्षात राहते. ऐकायला छान वाटते.
(हेही वाचा – Worli Sea Face: वरळी सी फेसवरील निसर्गसौंदर्याचा आनंद कसा घ्याल? वाचा सविस्तर )
गणपतीच्या आरतीचं वैशिष्ट्य –
बहुतेक आरत्यांचं लेखन समर्थ रामदासांनी केलं आहे. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती म्हणायला सोपी आहेच त्याहून सर्वांच्या आवडीची आहे. बहुतेक घरांमध्ये गणपतीबरोबर देवीची, शंकराची आरतीही म्हटली जाते. त्या म्हणण्याकरिता पुस्तकाचा वापर महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे चुकीची आरती म्हटली जाणार नाही. पुस्तकात बघून रोज म्हणता म्हणता आरती आपसूकच पाठ होईल.
हेही पहा –
–
Join Our WhatsApp Community