देशात आता लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरु आहे, आता देशातील जनतेला निकालाची प्रतीक्षा लागली आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला किती जागा मिळणार यावर भविष्यवाणी केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपा तृणमूलपेक्षा अधिक जागा मिळवेल, ही निवडणूक तृणमूलच्या अस्तित्वाची असणार आहे, असे म्हटले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सर्वाधिक यश मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची कामगिरी सर्वोत्तम ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका एकतर्फी आहेत. त्यांचे नेतृत्व जनता जनार्दन करत आहे. यामुळे सरकारमध्ये बसलेले टीएमसीचे लोक गडबडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हत्या होत आहेत. हल्ले होत आहेत. मतदानापूर्वीच भाजपा कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढे अत्याचार होऊनही लोक अधिकाधिक मतदान करत आहेत. टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे तीन लोक होते आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 वर नेले. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही लोकशाहीत वैर ठेवत नाही. आता प्रश्न आहे की, मी माझ्या संबंधांची काळजी करावी की ओडिशाच्या कल्याणाची? मी ओडिशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी मला माझ्या नात्यांचा त्याग करावा लागला तरी मी करेन. निवडणुकीनंतर मी सर्वांना समजावून सांगेन की, माझे कुणाशीही वैर नाही. ओडिशाकडे प्रचंड नैसर्गिक संसाधने आहेत. एका समृद्ध राज्यातील गरीब लोक पाहून वाईट वाटते. भारतातील समृद्ध राज्यांत ओडिशा आहे. एवढी नैसर्गिक संसाधने आहेत. तसेच, देशातील गरीब लोकांच्या राज्यातही ओडिशा आहे. याला सरकार जबाबदार आहे. यामुळे ओडिशातील सरकारची एक्सपायरी डेट 4 जून आहे आणि 10 जूनला भाजपचा मुख्यमंत्री ओडिशात मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community