संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला पूर्वी कृष्ण गिरी उपवन असे संबोधले जात असे. हे उद्यान 104 चौ.कि.मी. क्षेत्रफळ विशाल परिसरात पसरलेले आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली (Borivali) स्थानकाच्या पूर्वेला सुमारे 1 कि.मी. अंतरावर असून अतिशय विस्तीर्ण आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला अगदी लागून असलेल्या या उद्यानात गर्द वनराई, नदी, डोंगर, वन्य प्राणी, बागबगीचे आणि हिरवळ अशी निसर्ग सौंदर्याची रेलचेल आहे. (Sanjay Gandhi National Park)
(हेही वाचा – Rahul Gandhi आईवर ओझं; आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांची आगपाखड)
देशातील तसेच राज्यातील अनेक भागांतून पर्यटक (Tourist) मुंबईला भेट देत असतात. मुंबईत अनेक पर्यटन स्थळं आहेत. त्यातीलचं एक प्रसिद्ध असं संजय गांधी नॅशनल पार्क. शेकडो पर्यटक या पार्कला आवर्जून भेट देतात. संजय गांधी पार्कमध्ये निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो. महापालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर हे पर्यटनस्थळ आहे. जवळजवळ 104 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हे पसरलेले आहे. याला ‘काळा पहाड’ म्हणूनही संबोधले जाते.
या उद्यानात विविध प्रकारची सस्तन प्राणी, विविध प्रकारचे उभयचर प्राणी, विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पहायला मिळतात. तसेच
मुंगूस, रानमांजर, अस्वल, हरीण इत्यादी प्राण्यांचादेखील वावर या अभयारण्यामध्ये होतो. या उद्यानामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. इतकेच नाही, तर या पार्कमध्ये अनेक बुद्धकालीन लेण्या (Kanheri Caves) पहायला मिळतात. कान्हेरी लेणी इथंच आहे.
केव्हा जाता येईल ?
सकाळी साधारणपणे 8 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी खुले असते. प्रौढ व्यक्तींसाठी 77 रुपये, तर लहान मुलांसाठी 41 रुपये प्रवेश फी आहे. तसेच सोमवारी बंद असते.
कसे जाल ?
विमानाने
संजय गांधी राष्ट्रीय उद्याना पासून सर्वात जवळचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई आहे.
रेल्वेने
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेवरील बोरिवली रेल्वे स्थानक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरीवली स्टेशनपासून साधारण 1 किमी अंतरावर आहे.
रस्त्याने
संजय गांधी नॅशनल पार्क जवळ बोरिवली बस स्थानक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली बस स्थानकापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे. (Sanjay Gandhi National Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community