निवडणूक प्रचार संपल्यानंतर PM Narendra Modi कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करणार

181

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या दिवशी 57 जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता कन्याकुमारी येथील रॉक मेमोरियलवर ध्यान करून करणार आहेत. ३० मे ते १ जून या कालावधीत मोदी कन्याकुमारीत असतील. यावेळी ते स्वामी विवेकानंदांनी ज्या ठिकाणी ध्यान केले होते त्याच ठिकाणी रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपामध्ये ध्यान करतील. 18 मे 2019 रोजी, लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, मोदींनी केदारनाथच्या रुद्र गुहेत ध्यान केले होते. सुमारे 17 तास ते गुहेत थांबले होते.

(हेही वाचा लोकसभा निवडणूक निकालापूर्व Indi alliance च्या बैठकीत ममता बॅनर्जींनंतर उद्धव ठाकरेही राहणार गैरहजर   )

31 मे रोजी संपूर्ण दिवस मोदींचे ध्यान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी लोकसभेच्या 57 जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांसाठीचा निवडणूक प्रचार ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी 30 मे रोजी रात्री तामिळनाडूतील कन्याकुमारीला पोहोचणार आहेत. 31 मे रोजी सकाळी मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देतील. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) रॉक मेमोरिअलवर पोहोचतील आणि तेथे दिवसभर ध्यान करतील. 1 जून रोजी ध्यानधारणा पूर्ण केल्यानंतर मोदी कन्याकुमारीहून तिरुअनंतपुरमसाठी रवाना होतील आणि तेथून दिल्लीला जातील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.