२८ मे रोजी देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४१ वी जयंती साजरी करण्यात आली.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात वीर सावरकरांना अभिवादन
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव्यास होते. सन १९०२ ते १९०५या कालावधीत सावरकर या वसतिगृहातील खोली क्रमांक १७ मध्ये वास्तव्यास होते.
ती खोली दरवर्षी जयंतीनिमित्त दर्शनासाठी खुली करण्यात येते. या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचं जतन देखील करण्यात आलं आहे. या खोलीचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकांचं वेगळं नातं होतं.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त जे.जे. रुग्णालयात सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.
कन्नड प्राथमिक शाळा, अंगडी, कारवार, कर्नाटक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला वाहिली आदरांजली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे माहीम विधानसभा महिला अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त वाहिली आदरांजली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप आयुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला वाहिली आदरांजली.
१४१ व्या जयंतीनिमित्त भगूरमध्ये संगीत कार्यक्रमासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन.
मध्य रेल्वेच्या मोटरमन चालक संघटनेने CSMT स्टेशनवर साजरी केली स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती.
समृद्धी प्रसारक आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्या पदाधिकाऱ्यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन वीर सावरकरांना आदरांजली वाहिली.