Girgaon Chowpatty : जाणून घेऊया गिरगाव चौपाटीबद्दल १० आकर्षक गोष्टी!

253
Girgaon Chowpatty : जाणून घेऊया गिरगाव चौपाटीबद्दल १० आकर्षक गोष्टी!

मुंबईत आकर्षणाची अनेक केंद्रे आहेत. मुंबईच्या बाहेरील आणि महाराष्ट्रातल्याच गावाकडच्या लोकांना मुंबईचे भलतेच आकर्षण आहे. पण खरं सांगायचं तर मुंबई आता ट्रॅफिकने भरली आहे. इथे रस्ता ओलांडतानाही बाहेरच्या लोकांना त्रास होतो. तरी देखील मुंबई भोवतीचं वलय काही कमी होत नाही. नोकरीसाठी, फिरण्यासाठी मुंबई इतरांना आकर्षित करतच असते. (Girgaon Chowpatty)

मुंबईतील अनेक प्रेक्षणीय ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे गिरगाव चौपाटी. गिरगाव हे मराठी माणसाचं हक्काचं ठिकाण असं म्हणतात. आजही गिरगावात मराठी माणसाची टक्केवारी अधिक आहे. गिरगाव चौपाटी हे मराठी माणसासाठी आणि पर्यटकांसाठी निवांत वेळ घालवण्याचं हक्काचं ठिकाण आहे. चला तर गिरगावाबद्दल काही आकर्षक गोष्टी जाणून घेऊया. (Girgaon Chowpatty)

१. कुठे आहे गिरगाव चौपाटी? :

गिरगाव चौपाटी म्हणजे मुंबईतील गिरगाव परिसरात मरीन ड्राइव्हला लागून असलेल्या क्वीन्स नेकलेसच्या बाजूला असलेला समुद्रकिनारा आहे. हे कोकण विभागात येते आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकापासून १० मिनिटांत चालत जाऊ शकता. (Girgaon Chowpatty)

२. गणपती विसर्जन :

गणेश चतुर्थीच्या १० दिवसांच्या उत्सवादरम्यान हा समुद्रकिनारा गणेश विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. उत्सवानंतर सिंधू सागरात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून हजारो लोक येतात. तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमही इथे होतात. (Girgaon Chowpatty)

३. सांस्कृतिक केंद्र :

विशेष म्हणजे गिरगाव चौपाटी हे एक सांस्कृतिक केंद्र आहे. यास इतिहास देखील आहे, विविध उत्सवांसाठी देखील हे स्थळ प्रसिद्ध आहे. तसेच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटायचा असेल तर या स्थळाला नक्कीच भेट द्या. (Girgaon Chowpatty)

४. काळी वाळू? :

२०१६ मध्ये, या भागातील संभाव्य ऑईल स्लीकमुळे समुद्रकिनाऱ्यावरील वाळू काळी पडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. ही खरोखरच अद्भुत घटना मानली जाते. (Girgaon Chowpatty)

(हेही वाचा – Coastal Road : कोस्टलच्या मार्गातील गळतीवर याचा होणार मारा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश)

५. पर्यावरणपूरक तरतूद :

इथे गणपती मूर्तीचे विसर्जन होते. मात्र पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पीओपी ऐवजी कारागिरांनी बनवलेल्या मातीच्या मूर्ती वापरण्याचे आदेश दिले आहे. चिकणमातीच्या मूर्ती सागरी जीवनाला हानी न पोहोचवता समुद्रात लवकर क्षीण होतात, तर पीओपी मूर्ती प्रदूषणाला हातभार लावतात. त्यामुळे इथला समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि सुंदर आहे. (Girgaon Chowpatty)

६. चौपाटी नाव कसे पडले? :

“चौपाटी” हे नाव “चौ-पाटी” या नावावरुन आले आहे, ज्याचा मराठीत अर्थ “चार वाहिन्या” किंवा “चार खाड्या” असा अर्थ होतो. हे ठाणे जिल्ह्यातील सातपाटी गावाशी साधर्म्य साधणारे आहे, सातपाटी म्हणजे पाण्याचे सात विभाग असलेल्या जलवाहिन्या… (Girgaon Chowpatty)

७. ऐतिहासिक महत्त्व :

मरीन ड्राईव्हवर २६/११ ला इस्लामी जिहादी अतिरेक्यांनी आक्रमण करुन लोकांचा बळी घेतला. या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पकडून अटक करण्यात आली. कसाबला पकडण्यात मदत करणारे पोलिस हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचा पितळी अर्धाकृती पुतळा समुद्रकिनाऱ्याजवळ उभारण्यात आला आहे. (Girgaon Chowpatty)

८. शिवस्मारक :

गिरगाव चौपाटी समुद्रकिनाऱ्यासमोर, शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ऐतिहासिक हिंदू योद्धा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१०-मीटर (६९०-फूट) उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. (Girgaon Chowpatty)

९. रामलीला कार्यक्रम :

नवरात्रीच्या काळात गिरगाव चौपाटीवर रामलीला नाटकाचे आयोजन केले जाते. अनेक भाविक रामलीलामध्ये तल्लीन होतात आणि विजयादशमीला रावणाचा पुतळा वाळूवर उभारला जातो आणि जाळला जातो. (Girgaon Chowpatty)

१०. लोकमान्य टिळकांचे अंतिम संस्कार :

गिरगाव चौपाटीवर टिळकांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्यांचे दर्शन घ्यायला सुमारे २ लाख लोक जमा झाले होते. एवढी प्रचंड गर्दी बघूण इंग्रज सरकार अवाक झाले होते. लोकमान्य म्हणजे काय, याचा अर्थ इंग्रजांना कळून चुकला होता. त्यानंतर जहाल क्रांतिकारकांना प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्यांना कठोराहून कठोर शिक्षा होईल अशी काळजी ब्रिटिशांनी घेतली. (Girgaon Chowpatty)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.