गोपालन नायर शंकर (Gopalan Nair Shankar) यांना जी. शंकर या नावाने ओळखले जाते. हे केरळमधील एक महान वास्तुविशारद (Architect) आहेत. ते स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्याचा वापर, पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करुन वास्तू उभारतात. १९८७ मध्ये, जी. शंकर यांनी हॅबिटॅट टेक्नॉलॉजी ग्रुपची स्थापना केली, जी दक्षिण आशियातील निवारा क्षेत्रातील सर्वात मोठी एनजीओ झाली. सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देणे हे त्यांचे ध्येय आहे. (People’s Architect)
२९ मे १९५९ रोजी त्यांचा जन्म झाला. ते लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. प्रख्यात वास्तुविशारद लॉरी बेकर यांच्या जीवनातून आणि कार्याद्वारे प्रेरित होऊन, जी. शंकर सामान्य माणसाच्या, उपेक्षित गटांच्या, मच्छीमारांच्या, झोपडपट्टीतील रहिवासी आणि आदिवासींच्या घरांच्या गरजांना प्राधान्य देतात. स्थापत्यकलेच्या माध्यमातून सामाजिक विकासाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे त्यांना “People’s Architect” ही पदवी मिळाली आहे. (People’s Architect)
(हेही वाचा – भोसरीत वास्तव्य करणाऱ्या Bangladeshi infiltrators अटकेत; बनावट कागदपत्रे जप्त)
जी. शंकर यांनी ‘या’ तंत्रज्ञानावर दिला भर
विशेष म्हणजे ते १९८७ पासून श्रीलंका आणि मालदीवमधील आपत्ती निवारणासाठी UN चे सल्लागार आहेत. जी. शंकर (Ji Shankar) सध्या आर्किटेक्ट्स सॅन्स फ्रंटियर्सचे आंतरराष्ट्रीय संचालक म्हणून काम करतात आणि ते साउथ एशियन कोलिशन ऑफ कम्युनिटी आर्किटेक्ट्सचे अध्यक्ष आहेत. भारतासह त्यांनी श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, पॅलेस्टाईन आणि हैती येथे मोठे बांधकाम प्रकल्प हाती घेतले आहेत, ज्यात किफायतशीर, पर्यावरणास अनुकूल आणि टिकाऊ बांधकाम तंत्रज्ञानावर भर दिला आहे. (People’s Architect)
२०११ मध्ये, भारत सरकारने जी. शंकर (Ji Shankar) यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अद्भुत सेवेची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आणि एका सच्च्या वास्तुविशारदाचा (Architect) सन्मान केला. त्यांच्या कार्याला प्रणाम… (People’s Architect)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community