मान्सूनची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि उष्णतेने हैरान झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून आता हळूहळू पुढे सरकत आहे. लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. (Monsoon)
(हेही वाचा –Khadakwasla Dam : खडकवासला धरणात महिनाभराचेच पाणी शिल्लक)
यापार्श्वभुमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे आटोपून घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे. त्यातच उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. ज्यामुळे शहरासह ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. (Monsoon)
‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
मुंबईसह, उपनगर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Monsoon)
मान्सून महाराष्ट्रात कधी ?
मे महिन्याच्या शेवटी मान्सून (Monsoon) केरळात दाखल होईल. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत १० जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Monsoon)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community