State Cabinet Expansion : शिंदे सरकारचा महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार?

199
State Cabinet Expansion : शिंदे सरकारचा महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार?
State Cabinet Expansion : शिंदे सरकारचा महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार?
  • सुजित महामुलकर

रखडलेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार? याचीच चर्चा गेल्या वर्षभरापासून होत असून या प्रश्नाचे उत्तर आता सापडले आहे. अनेक आमदार यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. (State Cabinet Expansion)

कोण कोण रांगेत?

शिवसेना प्रतोद भरत गोगावले, संजय शिरसाट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदार बच्चू कडू, भाजपाचे (BJP) आमदार डॉ संजय कुटे, जयकुमार रावल असे अनेक इच्छूक रांगेत असून मंत्रिपदाची वाट बघत-बघत ही आमदारकीची मुदतही संपण्याच्या मार्गावर आली आहे. पुढील सहा महिन्यात, नोव्हेंबर २०२४ मध्ये सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार असून काहींना तर पुढच्या विधानसभेचे वेध लागले. (State Cabinet Expansion)

(हेही वाचा- Public Toilets : मुंबईत महिलांसाठी शौचालय किती? प्रजा फाऊंडेशन च्या अहवालात काय आले समोर!)

पक्ष फूटीमुळे विस्तार लांबणीवर..

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंड करुन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला तो शिवसेनेच्या (Shiv Sena) आणि भाजपाच्या (BJP) प्रत्येकी नऊ मंत्र्यांचा. शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला ३० जून २०२३ ला एक वर्ष पूर्ण झालं. तेव्हा फडणवीस यांनी ‘काही दिवसांतच, जुलै महिन्यात पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होईल,’ अशी घोषणाही करून टाकली होती आणि दोन-तीन दिवसातच राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) पक्ष फुटला. अजित पवार (Ajit Pawar) ४० आमदारांसह बाहेर पडले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (State Cabinet Expansion)

हालचाली सुरू  

नव्याने सामील झालेल्या पवार गटासोबत स्थिर-स्थावर व्हायला सहा-सात महीने जात नाही तोच लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली. आता लोकसभा निवडणुकही पार पडली आणि हालचाली सुरू झाल्या त्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या. (State Cabinet Expansion)

(हेही वाचा- Khadakwasla Dam : खडकवासला धरणात महिनाभराचेच पाणी शिल्लक)

सध्या मंत्र्यांची संख्या किती?

सध्या मंत्रिमंडळात २९ मंत्र्यांचा समावेश आहे. यात मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सेनेचे १० मंत्री आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपाचे १० मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एकूण ९ मंत्रीपदे देण्यात आली. (State Cabinet Expansion)

मंत्रिमंडळाची कमाल मर्यादा काय?

भारतीय राज्यघटनेच्या ९१ व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र किंवा राज्य शासन लोकसभा किंवा राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त १५ टक्के सदस्यांचा समावेश मंत्रिमंडळात होऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी १४ मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. एकूण मंत्रिमंडळाचा आकार ४३ पर्यंत वाढवता येऊ शकत असला तरी प्रत्येकी शिवसेना, भाजपा (BJP) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) ४-४ मंत्र्यांचा समावेश करून किमान २ जागा रिक्त ठेवल्या जाऊ शकतात, असे सांगण्यात आले. (State Cabinet Expansion)

(हेही वाचा- सुट्टीमध्ये एकदा भेट द्यायलाच हवी असे ठिकाण Sanjay Gandhi National Park)

विस्तार केव्हा होणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) यांचे भवितव्य ते किती जागा जिंकतात यावर अवलंबून असले तरी येत्या महिनाभरात हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असे भाजपाच्या (BJP) बड्या राजकीय नेत्याकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे जून २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात तत्कालीन कॉँग्रेस नेते अब्दुल सत्तर आणि अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.  (State Cabinet Expansion)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.