LIC: ‘एलआयसी’ही लवकरच देणार हेल्थ इन्शुरन्स; अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले…

त्यामुळे आता एलआयसीबरोबर पिढ्यानपिढ्या जोडल्या गेलेल्या पॉलिसीधारकांना आगामी काळात एलआयसीचीही आरोग्यविमा पॉलिसी खरेदी करता येईल.

168
LIC: 'एलआयसी'ही लवकरच देणार हेल्थ इन्शुरन्स; अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले...

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता आरोग्य विमा क्षेत्र यापुढे सर्वसाधारण विमा कंपन्यांची मक्तेदारी राहणार नाही, भारतीय आयुर्विमा मंडळानेही आता आरोग्यविमा क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने आरोग्य विमा क्षेत्रातील शक्यता पडताळत आहे, असे एलआयसीने म्हटले आहे.

त्यामुळे आता एलआयसीबरोबर पिढ्यानपिढ्या जोडल्या गेलेल्या पॉलिसीधारकांना आगामी काळात एलआयसीचीही आरोग्यविमा पॉलिसी खरेदी करता येईल, अशी माहिती एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी दिली आहे. आयुर्विमा क्षेत्रातील एखादी योजना आणणे यासाठी संमिश्र परवान्याची गरज आहे, असा संमिश्र परवाना विमा कायद्यात सुधारणा करून देता येणे शक्य आहे. विमा कायदा, १९३८ आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इरडा) यांच्या नियमानुसार, एखाद्या विमा कंपनीला आयुर्विमा सर्वसाधारण विमा किंवा आरोग्य विमा यासाठी संमिश्र परवाना देता येत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

(हेही वाचा – Monsoon: येत्या ४८ तासांत मान्सून केरळात दाखल होणार! महाराष्ट्रात कधी ?)

संमिश्र विमा परवानगीचा विचार
इरडाच्या म्हणण्यानुसार, एलआयसीने आर्थिक वर्षात २०२३ मध्ये २.९ लाख नव्या पॉलिसी जारी केल्या असून, जवळपास तीन लाख लोकांचे आयुष्य सुरक्षित केले आहे. विमा क्षेत्रात संमिश्र परवान्यास परवानगी दिल्याने त्याच्या विविध फायद्यांमुळे विमा क्षेत्राला आणखी चालना मिळू शकते तसेच विमा कंपन्यांसाठी खर्च आणि नियम पालनाच्या अडचणी कमी होऊ शकतात, कारण ते एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रकारचे विमा देऊ शकतात. यामुळे देशातील विम्याचा प्रसार आणि जागरूकताही वाढण्यास मदत होऊ शकते. ग्राहक एकाच विमा प्रदात्यांकडून कमी प्रीमियम आणि सुलभ दावा प्रक्रियेसह विविध प्रकारचे विमा एका पॉलिसीत घेऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

धोरणात्मक बदलावर लक्ष केंद्रित
गेल्या वर्षभरात आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये दिशात्मक बदल करण्यावर लक्ष केंद्रित केले. वैयक्तिक विमा व्यवसायात आमचा हिस्सा दुप्पट झाला असून, आता सर्व विमा श्रेणींमध्ये आमचा हिस्सा वाढावा, यासाठी धोरणात्मक बदलावर लक्ष केंद्रित करण्याचा मानस असल्याचे मत एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.