Delhi Weather: राजधानी दिल्ली उष्णतेने होरपळली! ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

213
Delhi Weather: राजधानी दिल्ली उष्णतेने होरपळली! ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Delhi Weather: राजधानी दिल्ली उष्णतेने होरपळली! ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi Weather) सूर्यदेव आग ओकत असून तापमान जवळपास ५० अंशावर पोहोचलं आहे. राजस्थानातून येणारे उष्ण वारे आणि कडक उन्हामुळे दिल्लीच्या बाहेरील भागात तापमानात वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, दिल्लीत पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची स्थिती कायम राहणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत जलसंकटही ओढावले आहे. (Delhi Weather)

(हेही वाचा –निबंध भोवणार! Pune Porsche Car Accident प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार)

दिल्लीत मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात तापमानात (Delhi Weather) मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे शहरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. IMD ने बुधवारच्या (२९ मे) आपल्या अंदाजात म्हटले आहे की, बुधवारी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवू शकते आणि जोरदार वारेही वाहतील. मात्र, आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. (Delhi Weather)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident घटना पुन्हा घडवणार; डिजिटल पुराव्यांसाठी ‘एआय’चा वापर)

दिल्ली, मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांप्रमाणेच, मुंगेशपूर आणि नरेला येथील दोन स्वयंचलित हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. दिल्ली विद्यापीठाजवळील अया नगर आणि रिज येथील मॅन्युअल वेधशाळांनी अनुक्रमे ४७.६ अंश सेल्सिअस आणि ४७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. (Delhi Weather)
स्कायमेट वेदरचे हवामानशास्त्र आणि हवामान बदलाचे उपाध्यक्ष महेश पलावत दि प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, ‘उघड जमीन असलेल्या मोकळ्या भागात रेडिएशन जास्त असते. थेट सूर्यप्रकाश आणि सावलीचा अभाव या भागांना अपवादात्मकपणे उष्ण करतात. वाऱ्याची दिशाही महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा पश्चिमेकडून वारे वाहतात, तेव्हा त्याचा सर्वात आधी या भागांवर परिणाम होतो. हे बाहेरचे ठिकाण असल्याने येथील तापमान झपाट्याने वाढते.’ (Delhi Weather)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.